Ravindra jadeja Fight : बुधवारपासून इंदूरच्या स्टेडियममध्ये बॉर्डर गावस्कर सिरीजचा (Border–Gavaskar Trophy) तिसरा सामना खेळवण्यात येतोय. या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र टीम इंडियासाठी (Team India) हा निर्णय फारचा चांगला ठरला नाही. अवघ्या 109 रन्सवर टीम इंडिया ऑल आऊट झाली. गोलंदाजीनंतर फलंदाजीमध्येही कांगारूंनी या सामन्यात चांगली पकड दाखवली. मात्र कांगारू फलंदाजी करत असताना रविंद्र जडेजाची (Ravindra Jadeja) एक गोष्ट सर्वांना खटकली. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फलंदाजी फारशी चांगली झाली नसल्याने टीम इंडियाचे खेळाडू काहीसे नाराज होते. अशातच रविंद्र जडेजाकडून नाराजीचा सूर भर मैदानात उमटला. टीम इंडिया गोलंदाजी करत असताना विकेट गोलंदाजांना विकेट मिळणं देखील कठीण वाटत होतं. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा स्पिनर रविंद्र जडेजा खेळाडूंना धक्काबुक्की करत असताना कॅमेरात कैद झाला. यावेळी जोर-जबरदस्ती करून तो विरोधी टीमला रन घेण्यापासून रोखत असल्याचं समोर आलं. 


स्टिव्ह स्मिथसोबत केली धक्काबुक्की


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या तिसरी टेस्ट मॅच खेळवली जातेय. या सामन्यामध्ये टीम इंडियाचा स्पिनर गोलंदाज रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याला विकेट मिळत नसल्याने, मैदातना त्याची धडपड सुरु होती. यावेळी जडेजा इतक्या खालच्या पातळी आला ती, क्रिजवरील खेळाडूंना रन घेण्यासाठी तो अडथळा आणताना दिसला. यावेळी स्मिथला जडेजाचा धक्का लागला आणि तो रन काढू शकला नाही. 


नेमकं काय घडलं?


मार्नस लाबुशेन आऊट झाल्यानंतर स्टिव्ह स्मिथ 36 व्या ओव्हरमध्ये नॉन स्ट्रायकर एंडवरून रन काढत होता. त्यावेळी रविंद्र जडेजा स्मिथला रन घेण्यापासून रोखण्यासाठी धावत असताना त्याच्या मध्ये गेला. यावेळी जडेजाचा स्मिथला धक्काही लागला. यावेळी स्मिथ गोंधळल्याने रन घेऊ शकला नाही, आणि पुन्हा नॉन स्ट्रायकर एंडला आला.   



टीम इंडियाचे फलंदाज ठरले फ्लॉप


रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताचे फलंदाज फ्लॉप गेले. टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला 30 पेक्षा अधिक रन्स करता आले नाहीत. यावेळी विराटने सर्वाधिक म्हणजेच 22 रन्स केले. त्यानंतर शुभमन गिलने 21 रन्सची खेळी केली. रोहित शर्मा 12, भरत 17 तर अक्षर पटेल 12 रन्सवर पव्हेलियनमध्ये परतले. कांगारूंच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. 


आर अश्विनने पटकावला बहुमान (ICC Bowler Test Ranking)


आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने गोलंदाजांची कसोटी क्रमवारी (ICC Test Rankings) जाहीर केली आहे. यात भारतीय गोलंदाजाने अव्वल स्थान पटकावंत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला (James Anderson) मागे टाकलं आहे. टीम इंडियाचा दिग्गज स्पीन गोलंदाज आर अश्विन जगातील नंबर वन गोलंदाज नबला आहे. 36 वर्षांच्या आर अश्विनच्या (R Ashwin) खात्यात 864 पॉईंट जमा झाले आहेत. तर जेम्स अँडरसनच्या खात्यात 859 पॉईंट्स आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स 858 पॉईंट्सह तिसऱ्या क्रमांकावर आहे.