मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्ध आज टीम इंडिया पहिला वन डे सामना खेळणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. के एल राहुल पाठोपाठ आता स्टार खेळाडू टीम इंडियातून बाहेर पडला आहे. त्यामुळे टीम इंडियाचं उपकर्णधारपद आता कोणाकडे सोपवणार पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

के एल राहुलला कोरोना झाल्याने तो टीममधून बाहेर पडला आहे. आता त्याच्या पाठोपाठ रवींद्र जडेजा देखील आजचा सामना खेळणार नाही अशी माहिती मिळाली आहे. रवींद्र जडेजाला दुखापत झाल्याने तो पहिला वन डे सामना खेळू शकणार नाही. वेस्ट इंडिज सीरिजमधून तो बाहेर देखील पडू शकतो. 


टीम इंडियाचा गेमचेंजर आणि सुपरस्टार अशी ओळख असलेल्या रवींद्र जडेजाला दुखापतीमुळे आजचा सामना खेळता येणार नाही. त्याची दुखापत अजून किती गंभीर आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली असून त्याच्यावर मेडिकल टीम लक्ष ठेवून आहे. 


क्रिकबझच्या अहवालानुसार टी 20 वर्ल्ड कप आणि आशिया कप लक्षात घेता, रवींद्र जडेजाला वन डे सीरिजमधून विश्रांती दिली जाऊ शकते. त्याची दुखापत वाढणार नाही यासाठी ही तरतूद असणार आहे. कारण तो टी 20 वर्ल्ड कपसाठी महत्त्वाचा खेळाडू आहे.


जडेजाकडे गेमचेंजरची महत्त्वाची भूमिका असते. हरत आलेला सामनाही तो आपल्या कौशल्याने टीम इंडियाला जिंकवून देऊ शकतो. त्याचं हे कौशल्य टी 20 वर्ल्ड कपसाठी फार गरजेचं आहे. जडेजाची दुखापत बरी झाल्यास तो पाच सामन्यांच्या टी 20 सीरिजमध्ये खेळताना दिसेल असं सांगितलं जात आहे.


या खेळाडूला मिळू शकते संधी?
पहिल्या वन डे सामन्यात रवींद्र जडेजाच्या जागी अक्षर पटेलला खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. वेस्ट इंडिज 


शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि  अर्शदीप सिंह