IPL 2024 : `आम्ही त्याला RCB सोडायला सांगितली पण...`, बंगळुरूच्या ट्विटने उडाली खळबळ!
RCB retained Mr Nags : आरसीबीने एक ट्विट केलंय. त्यात त्याने आपल्या कुटुंबातील एका व्यक्तीला संघ सोडण्यासाठी सांगितलं होतं. आरसीबीचं हे मजेशीर ट्विट मिस्टर नॅग्सशी संबंधित आहे.
RCB Retention Final List : आयपीएलमधील सर्वात प्रसिद्ध टीम म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 12 खेळाडूंना सोडचिठ्ठी दिली आहे. ज्यात वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga), हर्षल पटेल, जोश हेझलवूड (Josh Hazlewood), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हिड विली, वेन पारनेल, सोनू यादव, अविनाश सिंग, सिद्धार्थ कौल, केदार जाधव यांचा समावेश आहे. आरसीबीने यंदा 12 खेळाडूंना डच्चू देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. अशातच आता बंगळुरूच्या एका ट्विटने मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळतंय. आरसीबीने कोणाला संघ सोडायला लावलं होतं? पाहुया...
आरसीबीने एक ट्विट केलंय. त्यात त्याने आपल्या कुटुंबातील एका व्यक्तीला संघ सोडण्यासाठी सांगितलं होतं. आरसीबीचं हे मजेशीर ट्विट मिस्टर नॅग्सशी संबंधित आहे. होय, तेच आरसीबीचे कंटेन्ट क्रियेटर मिस्टर नॅग्स... आरसीबीने या ट्विटमध्ये म्हटलंय की, आम्ही मिस्टर नॅग्स यांना रिटेन केलंय. त्यांच्या सॅलरीवर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही त्यांना आरसीबी सोडायला लावलं होतं. मात्र, ते गेले नाहीत, असं म्हणत हसण्याची इमोजी आरसीबीने शेअर केली आहे.
शाहबाज अहमदला (Shahbaz Ahamad) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरकडून (RCB) सनरायझर्स हैदराबादमध्ये (SRH) तर मयंक डागरला यंदाच्या आयपीएल हंगामापूर्वी इंडियन प्रीमियर लीग ट्रेडिंग विंडोमधून हैदराबादकडून आरसीबीमध्ये ट्रेड केल्याची माहिती आयपीएलच्या अधिकृत वेबसाईटकडून देण्यात आली आहे. सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची ही पोस्ट चर्चेचा विषय आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
कायम ठेवलेले खेळाडू : आकाश दीप, अनुज रावत, दिनेश कार्तिक, फाफ डु प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, हिमांशू शर्मा, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर, मनोज भंडागे, मयंक डागर, मोहम्मद सिराज, कॅमरून ग्रीन, राजन कुमार, रजत पाटीदार, रीस टोपले, सुयश प्रभुदेसाई, विराट कोहली, विजय कुमार, विल जॅक्स.
सोडलेले खेळाडू : अविनाश सिंग, डेव्हिड विली, फिन ऍलन, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, केदार जाधव, मायकेल ब्रेसवेल, सिद्धार्थ कौल, सोनू यादव, वानिंदू हसरंगा, वेन पारनेल.