मुंबई : 26 मार्चपासून आयपीएल सुरु होणार आहे. एव्हाना सर्व टीम्सची तयारी झाली असेल. मात्र रॉयल चॅलेंजर बंगळूरू म्हणजेच आरसीबी टीमचा कर्णधार मात्र ठरलेला नाही. कर्णधारपदाची धुरा कोणाकडे जाणार हे 12 मार्च रोजी ठरणार आहे. दरम्यान यासंदर्भात अजून एक गोष्ट समोर आलीये ती म्हणजे, विराट कोहलीचा राजीनामा अजून स्विकारलेला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरसीबीकडून विराट कोहलीचा राजीनामा स्वीकारला नाही याचा अर्थ तो पुन्हा टीमचा कर्णधार होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. दरम्यान कर्णधारपदाच्या शर्यतीत फाफ डू प्लेसिस, दिनेश कार्तिक यांची आघाडीवर आहे. फाफला आरसीबीने 7 कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं आहे. 


विराट कोहली 2008 पासून रॉयल चॅलेंजर बंगळूच्या टीमचा भाग आहे. 2013 मध्ये त्याने कर्णधार म्हणून टीमची कमान सांभाळली. मात्र विराटच्या नेतृत्वाखाली RCB कधीच IPL चॅम्पियन बनू शकलेली नाही. बंगळुरूचे कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली टीम इंडियाचा वनडे आणि कसोटी कर्णधारपदंही सोडलं.


दरम्यान दरम्यान क्रिकइन्फोशी बोलताना डॅनियल व्हिटोरी म्हणाले, "विराट पुन्हा आरसीबीचा कर्णधार होणार नाही. फ्रँचायझी क्रिकेट किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, एकदा कर्णधार गेला की, त्याव्यतिरीक्त वेगळ्या नावाचा विचार करणं योग्य असतं."