मुंबई :  टीम इंडिया आणि आरसीबीची माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) गेल्या काळापासून अपयशी ठरतोय. विराटला धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. विराटला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. विराट मंगळवारी लखनऊ विरुद्धच्या सामन्यात पहिल्याच बॉलवर आऊट झाला. (rcb royal challengers bangalore and team india former captain virat kohli not scored century in last 100 match)


विराटच्या नावे नकोसा विक्रम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले. विराटने अनेक दिग्गजांना मागे टाकत विक्रमाला गवसणी घातली. आताही विराटच्या नावावर विक्रम झालाय. पण तो नकोसा असा रेकॉर्ड आहे. विराटला गेल्या 100 सामन्यांमध्ये एकही शतक लगावता आलेलं नाही.


विराटच्या या 100 सामन्यांमध्ये 17 कसोटी, 21 वनडे, 25 टी 20 आणि 37 आयपीएल मॅचचा समावेश आहे. मात्र विराटची शतकाची प्रतिक्षा अजूनही कायम आहे. 


विराटच्या 119 धावा


विराटने आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 7 सामन्यांमध्ये 19.83 सरासरीने 119 धावा केल्या आहेत. यामध्ये 48 ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. विराटने आयपीएल कारकिर्दीत 214 सामन्यात 5 शतकं आणि  42 अर्धशतकांसह 6 हजार 402 धावा केल्या आहेत. 


टीम इंडियासाठी चिंतेचा विषय


विराटकडून टीम इंडियाला मोठ्या अपेक्षा आहेत. कॅपट्न्सीच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर विराटकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे. मात्र विराटचा गेल्या काही काळापासून हरवलेला फॉर्म हा टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे.