Faf Du Plessis Run Out Controversy : आयपीएलचा महत्त्वाचा सामना बेंगळुरू आणि चेन्नई (RCB vs CSK) यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या (Faf Du Plessis) रन आऊटचा मुद्दा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. अंपार्यसने फाफला आऊट (Run Out Controversy) घोषित केलं होतं. याच निर्णयाबाबत चाहत्यांमध्ये निराशा आणि संताप असल्याचं पहायला मिळतंय. नेमकं काय झालं? याचा व्हिडीओ (Viral Vide) देखील सध्या व्हायरल होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, टॉस जिंकल्यानंतर चेन्नईने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस मैदानात फलंदाजीला आले. दोघांनी वादळी सुरूवात केली. 3 ओव्हरमध्ये 31 धावा कुटल्या. त्यानंतर पावसाने खोडा घाल्यानंतर सामना थांबला. सामना पुन्हा सुरू झाल्यानंतर आरसीबीची धावगती कमी झाली. विराट कोहलीला मिचेल सँटनरने बाद केले. यानंतर आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस नॉन-स्ट्रायकिंग एन्डला धावबाद झाला. मिशेल सॅटनर बॉलिंग करत असताना फाफची विकेट गेली. मात्र, फाफ खरंच बाद झाला होता का?


फाफ डू प्लेसिस नॉन-स्ट्रायकिंग एंडला असताना रजत पाटीदार स्ट्रेट ड्राईव्ह मारला. तेव्हा सॅटनरच्या हाताला बॉल लागून नॉन स्ट्राईक एन्डच्या बेल्स उडाल्या. त्यावेळी फाफने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याची बॅच थोडी कमी राहिली, असं अंपायर्सचं म्हणणं आहे. मात्र, फाफची बॅट पोहोचली तेव्हा बेल्स उडाले नव्हते, असंही काही तज्ज्ञांनी म्हटलंय. व्हिडीओ पाहून फाफ आऊट की नॉट आऊट?


पाहा Video



रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज.


चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महेश थीक्षाना.