RCB Vs CSK च्या सामन्यात `या` तरुणीने वेधलं लक्ष, तुम्ही पाहिलात का `सेनोरिटा`चा VIDEO?
RCB vs CSK Girl Dance Viral Video: CSK चा पराभव करत RCB ने IPL 2024 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. पण या मॅचदरम्यान मिस्ट्री गर्लने सर्वांचं लक्ष वेधलं. या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
RCB vs CSK Girl Dance Viral Video: आयपीएलची सांगता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. IPL 2024 च्या या सिझनमध्ये अनेक वाद विवादसह खेळांडूंचे असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. मॅच दरम्यान काही तरुणींनीही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. खरं तर या मिस्ट्री गर्ल्स कॅमेराच्या नजरेतूनही चुकल्या नाहीत. CSK चा पराभव करून RCB ने IPL 2024 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. हा सामना जिंकल्यानंतर आरसीबीच्या खेळाडूंनी ज्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं ते सोशल मीडियावर व्हायरल झालं. याच मॅचदरम्यान एका तरुणीचा व्हिडीओ समोर आला आहे. तो व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
मिस्ट्री गर्लच्या स्टाईलने लावलं वेड!
RCB Vs CSK च्या सामन्यात ज्यावेळी सीएसके संघ बॅटिंग करत होता त्यावेळी एका तरुणीचं कृत्य पाहून सगळे अवाक् झाले. तेव्हा कॅमेरामनने प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या मिस्ट्री गर्लकडे लक्ष गेलं आणि त्याने तिला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. या तरुणीने सेनोरिटा या गाण्यावर जबरदस्त शैलीत डान्स केला. तिचे ठुमके पाहून प्रेक्षकही घायाळ झाले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओतील मिस्ट्री गर्लच्या स्टाईलने चाहत्यांची मने जिंकली असून त्याचबरोबर चाहते कॅमेरामनचे खूप कौतुक करत आहेत.
या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अनेक अकाऊंटवर शेअर होत आहे. या तरुणीसोबत एक लहान मुलगही दिसत आहे. तिच्यासोबत या तरुणीने ज्या स्टाइलने डान्स केला आहे, ते पाहून प्रत्येक जण अवाक् झाले आहेत.
दरम्यान आयपीएल 2024 च्या प्लेऑफसाठी पात्र ठरून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चौथ्या स्थानावर आपलं स्थान निश्चित केलंय. बेंगळुरू संघाने मागील 6 पैकी 6 सामने जिंकून या मोसमात 14 सामन्यात 708 धावा केल्यानंतर संघाचा प्रमुख खेळाडू विराट कोहली केशरी टोपीचा मानकरी ठरला आहे. याशिवाय रजत पाटीदारनेही बॅटने चमकदार कामगिरी केलीय. मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल यांनी गोलंदाजीत आपली जादू दाखवली आहे.
आज राजस्थान आणि बेंगळुरू यांच्यात होणारा एलिमिनेटर 1 सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यानंतर क्वालिफायर 2 सामने 24 मे रोजी खेळवले जाणार असून 26 मे रोजी चेन्नई इथे अंतिम सामना रंगणार आहे.