RCB vs LSG, IPL 2023: आयपीएलच्या 16 व्या हंगामाचा 15 वा सामना रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) आणि लखनऊ सुपर जायन्ट्स  (Lucknow Super Giants) यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात लखनऊने बंगळुरूचा पराभव केलाय. अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या सामन्यात लखनऊने 1 गडी राखून विजय मिळवला आहे. दिनेश कार्तिक (Dinesh kartik) आणि हर्शल पटेलच्या (Harshal Patel) एका चुकीमुळे आरसीबीला पराभवला सामोरं जावं लागलं. (RCB vs LSG Lucknow Super Giants win by 1 Wickets against Royal Challengers Bangalore In IPL 2023)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लखनऊने टॉस जिंकला आणि प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला होता. मात्र, किंग कोहलीने (Virat Kohli) लखनऊच्या गोलंदाजांचा हिरमोड केला. सुरूवातीपासून विराटने शस्त्र हातात घेतलं आणि चौफेर फटकेबाजी केली. विराटची बॅटिंग पाहून फाफ डुप्लेसिस देखील रंगात आला. विराटने 4 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने 61 धावा केल्या, तर डुप्लेसिसने (Faf du Plessis) 5 सिक्स आणि 5 फोर खेचत 79 धावांची खेळी केली. तर अखेरच्या षटकात मॅक्सवेलने (Glenn Maxwell) 3 फोर आणि 6 सिक्स मारत लखनऊला आस्मान दाखवलं. बंगळुरूने 20 ओव्हरमध्ये 212 धावा केल्या.


पाहा शेवटच्या ओव्हरचा थरार (Video)



आरसीबीने दिलेल्या 213 धावांचं आव्हान पार करताना लखनऊची सुरूवात चांगली झाली नाही. काईली मेयर्स (Kyle Mayers) आणि कॅप्टन राहूल (KL Rahul) स्वस्तात परतले. त्यानंतर कृणाल पांड्या आणि दीपक हुड्डा यांना चमक दाखवता आली नाही. अखेरीस मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) आणि निकोलस पुरन (Nicholas Pooran) यांनी सुत्र हातात घेतली.


आणखी वाचा - GT vs KKR: रिंकू सिंग याच्या कामगिरीवर अनन्या पांडे झाली फिदा; पोस्ट शेअर करत म्हणाली...


दरम्यान, अखेरच्या 4 ओव्हरमध्ये लखनऊला जिंकण्यासाठी 28 धावांची गरज होती. त्यावेळी निकोलस पुरन फक्त 18 चेंडूत 62 धावा करत मैदानात पाय रोवून उभा होता. सामना गमावणार असं वाटत असताना मार्कस स्टॉयनिस आणि निकोलस पुरन यांनी सामना लखनऊच्या पाड्यात झुकवला. शेवटच्या 3 बॉलमध्ये आरसीबीला 2 धावांची गरज होती. सामना 1 बॉल 1 पर्यंत गेला. शेवटच्या बॉलवर हर्षल पटेलने मंकडिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा हा डाव फसला. अंपायर्सने आरसीबीची अपील नाकारली. त्यानंतर अखेरच्या बॉलवर दिनेश कार्तिकने बॉल कलेक्ट करताना एक चूक केली आणि चुकीचा थ्रो केला. त्यावेळी आवेश खान आणि रवी बिश्नोईने धाव पूर्ण करत दोन अंक संघासह जोडले आहेत.