RCB vs UPW WPL 2023 : महिला प्रीमियर लीगमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरूद्ध यूपी वॉरियर्स यांच्यात सामना रंगला होता. एकतर्फी झालेल्या सामन्यात युपी वॉरियर्सच्या महिलांचा विजय झाला. युपीने बंगळूरूवर 10 विकेट्सने विजय मिळवला आहे. मुख्य म्हणजे पॉईंट्स टेबलच्या तळाला असलेल्या RCB च्या टीमला पहिल्या सिझनमध्ये अजून एकदाही विजयाला गवसणी घालता आलेली नाही. RCB चा हा सलग चौथा पराभव होता. 


स्मृती मंधाना पुन्हा फेल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला नाही. टीमची कर्णधार स्मृती मंधाना टीमना पुन्हा एकदा चांगली सुरुवात करून देण्यामध्ये फेल ठरली. मंधाना अवघ्या 4 रन्सवर माघारी परतली. आरसीबीकडून Ellyse Perry ने अर्धशतक झळकावत टीमचा स्कोर 100 पार नेण्यात मदत केली. याशिवाय सोफी डिव्हाईनने 36 रन्सची खेळी केली. याशिवाय आरसीबीच्या कोणत्याही फलंजादाला साजेशी कामगिरी करता आली नाही. 


युपीला 139 रन्सचं आव्हान


आरसीबीच्या टीमने युपीच्या महिलांना 139 रन्सचं आव्हान दिलं होतं. तर युपीच्या महिलांनी अगदी सहजरित्या एकंही विकेट न गमावता हे लक्ष्य पूर्ण केलं आहे. युपीकडून देविका वैद्य 36 रन्सची खेळी केली. तर अॅलिसा हिली युपीच्या विजयाची खरी शिल्पकार ठरली. 


अॅलिसा हिलीची कॅप्टन इनिंग


अॅलिसा हिलीने आरसीबीविरूद्धच्या सामन्यात 96 रन्सची खेळी केली. तिच्या या खेळीमध्ये 18 फोर्स आणि एका सिक्सचा समावेश आहे. अवघ्या 4 रन्सने अॅलिसा हिली शतकापासून दूर राहिली. मात्र आपल्या टीमला कर्णधाराने विजय मिळवून दिला आहे.


रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू प्लेइंग इलेव्हन 


स्मृती मंधाना (कर्णधार), सोफी डेव्हाईन, अलिसा पेरी, हीथर नाइट, ऋचा घोष (विकेटकीपर), एरिन बर्न्स, श्रेयंका पाटील, कनिका आहुजा, सहाना पवार, कोमल जंजाद, रेणुका ठाकूर सिंह.


यूपी वॉरियर्स प्लेइंग इलेव्हन


अॅलिसा हिली (कर्णधार), श्वेता सहरावत, तालिया मॅकग्रा, दीप्ती शर्मा, ग्रेस हॅरिस, सिमरन शेख, किरण नवगिरे, देविका वैद्य, सोफी एक्लेस्टन, अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड.