नवी दिल्ली : क्रिकेट जगतात अशा काही घटना घडतात ज्या पाहून सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का बसतो. ऑस्ट्रेलियात स्थानिक मॅचेस दरम्यानही असाच प्रकार घडल्याचं पहायला मिळालं.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियन बॅट्समन मॅथ्यु रेन्शो याच्या एका चुकीमुळे विरोधी टीमला ५ रन्स मिळाले. ऑस्ट्रेलियात शेफफील्ड शील्ड टूर्नामेंट दरम्यान हा प्रकार घडला आहे.


विरोधी टीमला ५ रन्स


शुक्रवारी गाबा येथे मॅच सुरु होती. या मॅचमध्ये मॅथ्युने विकेटकीपरचे ग्लोव्हज घालत बॉल पकडला. त्यानंतर अंपायरने विरोधी टीमला ५ रन्स दिले.


गोव्ह्ज घालणं पडलं महागात


मॅचमध्ये मॅथ्यु रेन्शा फिल्डिंग करत होता त्याच दरम्यान बॅट्समनने एक शॉट लेग साईडला खेळला. हा बॉल पकडण्यासाठी विकेटकीपर जिमी प्रेसन धावला आणि त्याच दरम्यान आपला एक ग्लोव्हज काढून फेकला. यानंतर बॉल पकडून मॅथ्यु रेन्शाच्या दिशेने फेकला. पण याच दरम्यान रेन्शाने प्रेसनचा ग्लोव्ह्ज घालत बॉल पकडला.



अंपायरने रेन्शाची ही चूक पकडली आणि तात्काळ टीमवर ५ रन्सची पेनल्टी लावली. क्रिकेटच्या २७.१ च्या नियमानुसार, मॅच दरम्यान मैदानात केवळ विकेटकीपर ग्लोव्ह्ज परिधान करु शकतो. त्याच्या व्यतिरिक्त इतर कुठलाच खेळाडू ग्लोव्ह्ज घालू शकत नाही. अंपायरने याच नियमानुसार क्विंसलँडच्या टीमवर पाच रन्सचा दंड ठोठावला आहे.