दिग्गज रेसलर रे मिस्टीरियो सीनियरचं निधन, 6* फुटांचा असूनही बुटका म्हणायचे...
रे मिस्टेरियो सीनियर हे WWE तील स्टार रेसलर रे मिस्टेरियो जूनियर याचे काका होते. काकांच्या निधनानंतर रे मिस्टेरियो जुनिअर याने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट लिहिली.
Rey Mysterio Senior Death : मॅक्सिकन रेसलिंगमधील दिग्गज कुस्तीपटू रे मिस्टेरियो सीनियर (Rey Mysterio Senior) याचं 66 व्या वर्षी निधन झालं आहे. रे मिस्टेरियो सीनियर हे WWE तील स्टार रेसलर रे मिस्टेरियो जूनियर याचे काका होते. काकांच्या निधनानंतर रे मिस्टेरियो जुनिअर याने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट लिहिली.
रे मिस्टेरियो सीनियर यांच्या करिअरची सुरुवात जानेवारी 1976 रोजी झाली. करिअर दरम्यान रे मिस्टेरियो सीनियरने कुस्तीतील अनेक चॅम्पियनशिप जिंकल्या. ज्यात WWA वर्ल्ड जूनियर लाइट हॅवीवेट चॅम्पियनशिपचा समावेश आहे. त्याने त्याचा भाचा रे मिस्टेरियो जुनिअर सह WWA टॅग टीम चॅम्पियनशिप देखील जिंकली होती. रे मिस्टीरियो सीनियर यांची उंची ही 5.9+ फूट एवढी होती. मात्र तरी देखील त्यांना इतर कुस्तीपटू बुटका म्हणून हिणवायचे. कारण WWA मध्ये सहभागी होणाऱ्या कुस्तीपटूंची साधारण उंची ही 6.5 ते 7 फूट इतकी असायची. मात्र या टीकेकडे लक्ष न देता त्यांनी कुस्तीच्या मैदानातील अनेक स्पर्धा जिंकून आपली प्रतिभा सिद्ध केली होती.
रे मिस्टेरियो सीनियर याने कुस्तीतून 2009 मध्ये निवृत्ती घेतली होती. त्यानंतर बऱ्याच स्पर्धांमध्ये त्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं जायचं. रे मिस्टेरियो सीनियर आणि जुनिअर हे दोघेही कुस्ती विश्वात मास्क मॅन म्हणून ओळखले जातात. मात्र रे मिस्टेरियो सीनियर यांचा पुतण्या रे मिस्टेरियो जुनिअर याने 1999 फेब्रुवारीमध्ये एका स्पर्धेदरम्यान स्वःला अन मास्क केले.
हेही वाचा : विराट कोहलीचा नवा हेअरकट पाहिलात का? मेलबर्न टेस्टपूर्वी सेट केला नवा ट्रेंड
रे मिस्टेरियो सीनियरच करिअर :
रे मिस्टेरियो सीनियरने जागतिक कुस्ती संघटना, तिजुआना रेसलिंग आणि प्रो रेसलिंग रिव्होल्यूशन यांसारख्या मेक्सिकन प्रमोशनमध्ये त्याच्या दमदार कामगिरी करून त्याचा ठसा उमटवला होता. रे मिस्टेरियो सीनियर हा एक प्रसिद्ध कुस्तीपटू असण्यासोबतच त्याचे भाचे रे मिस्टेरियो जुनिअर आणि डोमिनिक मिस्टेरियो यांचा गुरु देखील होता. दोघांनीही पुढे जाऊन WWE मध्ये चांगली कामगिरी केली.
रे मिस्टेरियो जुनिअरने लिहिली भावुक पोस्ट :
रे मिस्टेरियो जुनिअरने रे मिस्टेरियो सीनियर यांचे निधन झाल्यावर एक भावुक पोस्ट लिहिली. त्याने यात म्हटले की, "तुम्ही आमच्यासाठी नेहेमीच आदर्श उदाहरण असाल. आम्ही तुमच्यावर नेहमी प्रेम करत राहू. मी तुमच्याकडून खूप काही शिकलो. तुम्ही जीवनाच्या अखेरपर्यंत संघर्ष केला आणि तुमची सर्वात मोठी चिंता होती ती म्हणजे तुम्ही आईला मागे सोडताय. पण मी तुम्हाला आश्वस्त करतो की आई कधीही एकटी पडणार नाही, आम्ही सर्व मिळून तिची काळजी घेऊ. आता तुम्ही देवाच्या घरी गेला आहात, स्वर्गातून आमच्याकडे नेहमी आनंदाने पाहत राहा, आम्ही तुम्हाला कधीही विसरू शकत नाही.