मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपली पत्नी अनुष्का शर्माचा एक व्हिडीओ शनिवारी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा रस्त्यावर लक्झरी गाडीत बसलेल्या मुलाला ओरडताना दिसतेय. रस्त्यावर प्लास्टिकची बॉटल फेकल्याने अनुष्का त्या मुलावर ओरडतेय. जेव्हा विराटने हा व्हिडीओ पोस्ट केला तेव्हा सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. काहींनी यासाठी अनुष्काचे कौतुक केले तर काहींनी हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटलेय. ज्या मुलाला अनुष्का ओरडली त्या मुलाने विराट आणि अनुष्काच्या नावाने फेसबुक पोस्ट लिहीलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरहान सिंह असे या मुलाचे नाव आहे. त्याने फेसबुक पोस्टवर म्हटलेय, मी माझ्या चुकीसाठी माफी मागत होतो. मात्र त्यानंतरही अनुष्का ओरडत होती. अरहान सिंहनंतर त्याच्या आईनेही विराट आणि अनुष्काच्या या व्हिडीओला पब्लिसिटी स्टंट म्हटलेय. 


गीतांजली यांनी विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या या व्हिडीओवर स्पष्टीकरण देताना म्हटलेय, स्वच्छता अभियानाच्या नावाखाली स्वस्तात प्रसिद्धी मिळवण्याचा स्टंट आम्ही करु शकत नाही. कदाचित तुम्हाला दोघांना या व्हिडीओद्वारे कँपेन करुन काही पैसे मिळाले असतेली अथवा पब्लिसिटीसाठी तुम्ही हे काम केले. मात्र एक आई म्हणून सांगते की या व्हिडीओत स्पष्ट दिसतेय की माझ्या मुलाचा चेहरा स्पष्टपणे दाखवून त्याला बेईज्जत केले जातेय. 


त्या पुढे म्हणाल्या, मी माझ्या मुलाच्या सुरक्षेबाबत चिंतीत आहे. आपली फॉलोअर्सची संख्या वाढवण्यापेक्षा जर तुम्ही तुमच्या लेनची सफाई करण्याचा विडा उचलला असता तर बरं झालं असतं. जर तुम्हाला स्वच्छतेची इतकीच चिंता आहे तर लेनच्या सफाईवर लक्ष द्या. आपल्या फॉलोअर्सला मूर्ख बनवण्यासाठी व्हिडीओ पोस्ट करु नका.