MI vs KXIP मॅच दरम्यान दिसलेल्या मिस्ट्री गर्लची अशी आहे ओळख
एका सुंदर युवती साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
नवी दिल्ली : मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब दरम्यान आयपीएल १३ मधील ३६ वा सामना खेळला गेला. दोन सुपर ओव्हरमध्ये रंगलेला हा सामना ऐतिहासिक ठरला. दरम्यान प्रेक्षकांमध्ये एका सुंदर युवती साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. गेले दोन दिवस सोशल मीडियात तिच्या सौंदर्याची चर्चा आहे. ती मिस्ट्री गर्ल कोण आहे ? काय करते हे प्रश्न विचारले जाऊ लागले.
कोरोना सावटामुळे मैदानातील प्रेक्षकांची गॅलरी सुनीसुनी वाटतेय. आयपीएल फ्रेंचायजीसोबत टीमचे खेळाडू आणि स्टाफ गॅलरीत दिसतायत. सुपरओव्हरमध्ये कॅमरामॅनने कॅमेरा या मिस्ट्री गर्लकडे फिरवला आणि साऱ्यांचे लक्ष खिळून राहीले.
रियाना लालवानी असं या मुलीचं नाव असून ती इंस्टाग्राम युजर आहे. रियानाने स्वत:च एक मिम्स आपल्या इंस्टा स्टोरीमध्ये शेअर केलं होतं. यानंतर तिच्या इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली. तिचे फॉलोअर्स ७ हजारापासून ५५ हजारापर्यंत वाढले.
फोटो वायरल
रियानाचा फोटो खूप वायरल होतोय पण तिच्याबद्दल कोणाला काही माहिती नव्हती. अखेर तिने आपल्या अकाऊंटवरुन फोटो शेअर केल्यानंतर सर्वांच्या शंका दूर झाल्या. मुंबईत राहणारी रियाना लालवानीच ती मिस्ट्री गर्ल हे स्पष्ट झाले.