फक्त राणीची बागच नाही... लहान मुलांना नेता येईल अशी मुंबईतील पर्यटनस्थळं

सध्या मुलांची उन्हाळ्याची सुट्टी सुरु आहे. घरी बसून मुल कंटाळतात. यामुळे  मुल पालकांकडे पिकनिकला नेण्याचा हट्ट धरतात. मुलांची आणि पालकांची पहिली पसंती ही राणीची बाग असते. मात्र, या व्यतीरीक्त मुंबईत असे अनेक पिकनिक स्पॉट आहेत जिथे लहान मुलांना नेता येईल.

| May 03, 2024, 23:04 PM IST

Picnic Spot Near Mumbai for Kids : सध्या मुलांची उन्हाळ्याची सुट्टी सुरु आहे. घरी बसून मुल कंटाळतात. यामुळे  मुल पालकांकडे पिकनिकला नेण्याचा हट्ट धरतात. मुलांची आणि पालकांची पहिली पसंती ही राणीची बाग असते. मात्र, या व्यतीरीक्त मुंबईत असे अनेक पिकनिक स्पॉट आहेत जिथे लहान मुलांना नेता येईल.

1/9

 राणीची बाग हे मुबंईतील सर्वात प्रसिद्ध आणि लहान मुलांचे आवडते पर्यटन स्थळ आहे. मात्र, मुंबईत अशी आणखी काही ठिकाणं आहेत जिथे लहान मुलांना फिरायला नेता येईल. 

2/9

वनराणी जंगल सफारी

बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मुलांना वनराणी जंगल सफारीचा आनंद लुटता येईल. येथे एका टॉयट्रेनमधून जंगल सफारी घडवली जाते.   

3/9

कान्हेरी गुंफा

मुलांना इतिहासाठी ओळख करुन द्यायची असेल तर त्यांना बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असलेल्या कान्हेरी गुंफा येथे नक्की घेऊन जा. 

4/9

लायन सफारी

बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अर्थात नॅशनल पार्कमध्ये मध्ये मुलांना लायन सफारी करता येईल. एका बसमधूल ही लायन सफारी घडवली जाते. सिंह तसेच वाघ पहायला मिळतात.

5/9

बॉटनिकल गार्डन

मुलांना सायन येथील बॉटनीकल गार्डनमध्ये नक्की घेऊन जा. या गार्डनमध्ये विविध प्रकारच्या झाडे पहायला मिळतात.

6/9

नेहरु तारांगण

मुलांना अंतराळ तसेच ग्रह, ताऱ्यांच्या निरीक्षणाची आवड असेल तर येथे नक्की घेऊन जा. नेहरु तारांगण येथे आकाशाचे आभासी भ्रमण करता येते. 

7/9

मत्स्यालय

मरीन लाईन्स येथे असेलेले मत्स्यालय देखील चांगला पर्याय आहे. येथे लहान मुलांना विविध प्रकारचे मासे तसेच सागरी जीव पहायला मिळतील.  

8/9

नेहरु सायन्स सेंटर

वरळी येथे असलेल्या नेहरु सायन्स सेंटर हे लहान मुलांचे कुतूहल वाढवणारे ठिकाण आहे. येथे विज्ञानाशी संबधीत अनेक प्रयोग पहायला मिळतात.

9/9

छोटा काश्मिर

गोरेगाव येथे असलेले छोटे काश्मिर हे ठिकाण लहान मुलांसाठी उत्तम पिकनीक स्पॉट आहे. येथे मोठे गार्डन. यासह येथे बोटिंगचाही आनंद लुटता येतो.