टी20 वर्ल्ड कपमध्ये चॅम्पियन ठरणाऱ्या टीमची 'मज्जाच मजा', कोट्यवधींची होणार बरसात

T20 World Cup Prize Money: इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2024 चा अंतिम सामना 26 मे रोजी खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच म्हणजे 1 जूनपासून टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होईल. या स्पर्धेत 20 संघांनी सहभाग घेतला आणि विजेत्या संघावार पैशांची बरसात होणार आहे. 

| May 03, 2024, 22:33 PM IST
1/7

1 जूनपासून टी20 वर्ल्ड कप 2024 ला सुरुवात होईल. यंदा वेस्टइंडिज आणि अमेरिकेत ही स्पर्धा रंगणार आहे. टी20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना 29 जूनला खेळवला जाईल. 

2/7

भारताने 15 खेळाडूंच्या संघाची नुकतीच घोषणा केलीय. टीम इंडियाचं नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं आहे. तर उपकर्णधारपदी रोहित शर्माची नियुक्ती करण्यात आलीय.

3/7

भारतीय क्रिकेट संघाच्या मिशन' टी20 वर्ल्ड कप'ची सुरुवात 5 जूनपासून होईल. टीम इंडियाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध रंगणार आहे. त्यानंतर 9 जूनला भारत-पाकिस्तान आमने सामने असतील.

4/7

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (VC), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

5/7

यंदाच्या स्पर्धेत विजेत्या संघावर पैशांची बरसात होणार आहे. टी20 वर्ल्ड कपची एकूण प्राईज मन 5.6 मिलिअन डॉलर म्हणजे भारतीय रुपयात जवळपास  46.77 करोड रुपये इतकी आहे. 

6/7

टी20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाला तब्बल 1.6 डॉलर मिळणार आहेत. म्हणजे भारतीय रुपयात 13.36 कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. तर उपविजेत्या संघाला 6.68 कोटी रुपये दिले जाणार आहेत.

7/7

टी20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पराभूत होणाऱ्या संघाला 3.32 कोटी रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. तर सुपर-12 स्टेजमधून बाहेर पडणआऱ्या संघांमध्ये  5.85 कोटी रुपये वाटले जाणार आहेत.