शांघाई : रेडबुलच्या ऑस्ट्रेलियाई ड्राईव्हर डेनिअल रिकार्डोने रविवारी एक जबरदस्त कामगिरी केली. एका रेसमध्ये त्याने चायनीज ग्रां पी फॉर्म्यूला वनचा किताब जिंकला. आपल्या एकूण कारकिर्दीत त्याने सहाव्यांदा ग्रां पी किताबावर नाव कोरले आहे. ऑस्ट्रेलियाई रेसरने आठव्या स्थानापासून सुरूवात केली आणि सेफ्टी कार आल्यानंतरच्या कारकिर्दीत सहव्यांदा ग्रां पी जिंकले. आपल्या या विजयाच्या आनंदात रिकार्डो इतका बेभान झाला होता की, तो चक्क बुटाने शाम्पेन प्यायला. तो म्हणाला या रेसमध्ये मला प्रचंड मजा आली. 


टीमच्या संघर्षाचे मिळाले फळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, रिकार्डोने शनिवारी गाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक गडबड झाल्यानंतर सेंकडच्या फरकाने क्वालिफाईंगमध्ये जागा निर्माण केली होती. विजयानंतर त्याने आपल्या टीमचे अभार मानले. तो म्हणाला, '२४ तासांपूर्वी मला वाटत होते की, ग्रेडमध्ये मी सर्वात पाठीमागे होतो. पण, आज मी विजेता आहे. माझ्या टीमने जे काम केले आहे त्याचेच हे फळ आहे.' रेड बुल ड्राईव्हरने १० लॅपनंतर मोठी आघाडी घेतली. त्याने मर्सिडीकाच्या वॅलेटरी बोटासला मागे टाकले. त्यामुळे बोटास आणि फेरारीचा किमी रेकोनेन अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिले.


हेमिल्टन पाचव्या क्रमांकावर


दरम्यान, चॅम्पीयनशिप लीडर सेबेस्टियन वेटल पोल पोजिशनपासून सुरूवात केल्यावर अंतिम फेरीत आठव्या क्रमांकावर राहिला. त्याची मॅक्स वेरस्टेपनसोबत टक्कर झाली. त्याला जर्मन घेळाडूला टक्कर मारल्यामुळे १० सेकंदांची पेनल्टी मिळाली. गेल्या वर्ल्ड चॅम्पीयन लुईस हॅमिल्टन पाचव्या क्रमांकवर होता. तर, हॉलंडचा वेरस्टेपन पेनल्टीनंतर चौथ्या क्रमांकावर राहिला.