मुंबई : धावांच्या क्षमतेमुळे कायम विराट कोहलीची तुलना कायम सचिन तेंडुलकरसोबत केली जाते. यावर ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पोंटिगने नाराजगी व्यक्त केली आहे. त्याचं असं म्हणणं आहे की, करिअरच्या या टप्यावर भारतीय कॅप्टनची तेंडुलकरसारख्या महान खेळाडूबरोबर तुलना करणे चुकीचे आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेलबर्न क्रिकेट मैदानावर पोटिंग म्हणाला की, करिअरच्या या टप्यावर तुलना योग्य नाही. आणि ते ही अशा खेळाडूशी ज्याने 200 टेस्ट मॅच खेळले आहेत. सचिनचा खेळ आपण फक्त सुरूवातीचा आठवत नाही तर अगदी शेवटपर्यंत तो उत्तमच खेळत राहिला. प्रत्येकजण विराट कोहलीची तुलना सचिनसोबत करतात. पण हे बघणं महत्वाचं असणार आहे की, 10,12 आणि 15 वर्षांपर्यंत तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला खेळ टिकवून ठेवतो का? 


पुढे रिकी पोटिंग म्हणाला की,सचिनने आपला खेळ तिन्ही वेळेला उत्तम दाखवला. आणि ती एका चॅम्पियनची निशानी आहे. दोनशे टेस्ट खेळणं ही काही सामान्य गोष्ट नाही. मी सुद्धा 168 टेस्ट मॅच खेळलो मात्र दोनशेची गोष्ट वेगळी आहे. पुढे तो म्हणाला की, विराटचा करिअर ग्राफ कसा जातो बघूया. विराटचं करिअर संपल्यावर सचिनसोबत तुलना होणं ठिक आहे. पण या दोघांसोबत आता खूप चुकीचं होत आहे. 


विराट कोहलीने 71 टेस्टमध्ये 23 शतक केले असून 6147 धावा केल्या आहेत. तर सचिन तेंडुलकरने 200 टेस्टमध्ये 15921 धावा केल्या आहेत ज्यामध्ये 51 शतकांचा समावेश आहे. तर वन डे सामन्यात सचिनच्या नावावर 463 मॅच असून 49 शतक आणि 18426 धावा केल्या आहेत. विराटने 211 वनडेमध्ये 35 शतक आणि 9779 धावा केल्या आहेत.