Ricky Ponting On Glenn Maxwell : यंदाच्या वर्ल्डकपमध्ये 39 वा सामना ऑस्ट्रेलिया विरूद्ध अफगाणिस्तान ( Australia vs Afghanistan ) यांच्यात खेळवण्यात आला होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेला हा सामना रोमांचक झाला. ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल याने ( Glenn Maxwell  ) एकट्यानेच हा सामना कांगारूंसाठी खेचून आणला. पठ्ठ्यानं वादळी द्विशतक ठोकलं अन् प्रेक्षकांचा पैसा वसूल केलाय. मॅक्सवेलच्या वादळीसमोर अफगाणी सैन्य भूईसपाट झाल्याचं पहायला मिळालं. रिकी पाँटिंग (Ricky Ponting) या सामन्यात समालोचन करत होता. त्यावेळी त्याने एक भविष्यवाणी केली होती. 


नेमकं काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एखाद्या दुष्मनावर तुटून पडावं, अशी वादळी खेळी मॅक्सवेल याने अफगाणिस्तानविरुद्ध केली. वर्ल्ड कप म्हटलं की कांगारूंच्या अंगात उत्साह संचारतो, त्यांच्यात लढण्याची जिद्द असले. याचच उदाहरण कालच्या सामन्यात पहायला मिळालं. न भूतो ना भविष्य अशी खेळी मॅक्सवेलने केली. मॅक्सवेलच्या 100 कधी झाल्या याचा पत्ता देखील लागला नाही. मात्र, त्याने पुढील 100 धावा उभ्या उभ्या चोपल्या. मॅक्सवेल जेव्हा 195 धावांवर खेळत होता. तेव्हा ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 5 धावांची गरज होती. रिकी पाँटिंग समालोचन करत होता, तेव्हा त्याने पुढच्या बॉलवर भविष्यवाणी केली. तुम्हाला माहिती का पुढच्या बॉलवर काय होणारे? असा सवाल रिकी पाँटिंगने सहकाऱ्याला विचारला.


काय होणार? असा प्रतिप्रश्न आल्यावर रिकीने पुढच्या बॉलवर सिक्स बसणार, असं भाकित रिकी पाँटिंगने केली आणि पुढच्या तीन सेकंदात मॅक्सवेलने खणखणीत सिक्स मारत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. . या सिक्सच्या जोरावर मॅक्सवेलने आपलं दुहेरी शतक देखील पूर्ण केलं. मॅक्सवेलचा सिक्स पाहून रिकी पाँटिंगचा आनंद गगनात मावला नाही.


पाहा Video


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ICC (@icc)


दरम्यान, ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेल एकटाच लढला. 292 रन्सचं टारगेट असताना त्याने 201 रन्सची शानदार खेळी केली. एकेकाळी ऑस्ट्रेलियाचा पराभव निश्चित मानला जात होता पण मॅक्सवेलने आपल्या तुफान खेळीच्या जोरावर विजयापर्यंत नेलं अन् ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलमध्ये पोहोचवलं आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यानंतर सेमीफायनलमध्ये पोहचणारा ऑस्ट्रेलिया तिसरा संघ ठरलाय. दोन्ही संघामध्येच दुसरा सेमीफायनलचा सामना होणार आहे.