Ricky Ponting On Australias next skipper : वनडे वर्ल्ड कप असो वा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप ऑस्ट्रेलियाने नेहमी भारताचं स्वप्न भंग केलंय. अंडर -19 वर्ल्ड कपमध्ये देखील ऑस्ट्रेलियाने (IND vs AUS) भारताला मात दिली अन् युवा खेळाडूंचा हिरमोड केला. अशातच आता आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची (T20 World Cup 2024) सर्वजण वाट पाहत आहेत. ऑस्ट्रेलियाचा पराभव करून पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय संघ तयार आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया संघात खांदेपालट होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलिया संघ आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये नव्या कर्णधाराच्या (Australias next skipper) नेतृत्वाखाली खेळू शकतो. याबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंग (Ricky Ponting) याने मोठं वक्तव्य केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाला रिकी पॉटिंग?


मिचेल मार्श ऑस्ट्रेलियासाठी टी-20 कर्णधार करू शकतो, अशी आशा पाँटिंगने व्यक्त केली आहे. मार्शकडे ती क्षमता आहे, असंही पॉटिंग म्हणतो. मला वाटतं की तो टी-ट्वेंटीसाठी कर्णधार असेल, तो त्याला पात्र आहे आणि तो एक खेळाडू म्हणून खूप परिपक्व झालाय. तो नक्कीच नेतृत्व करू शकतो. मला आठवतं, पाच-सहा वर्षांपूर्वी जस्टिन लँगरने ऑस्ट्रेलियन संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली होती. लँगरने प्रत्यक्षात त्यावेळी मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांची नावे घेतली होती. मिचेल मार्श नेहमीच निवडकर्त्यांच्या मनात असावा, अशी आशा रिकी पॉटिंग याने व्यक्त केली आहे.


मला असं वाटतं की, मिशेल मार्शला त्याच्या भूमिकेत  सातत्य ठेवावं लागेल. त्याला कॅप्टन्सीच्या भूमिकेवर ठाम रहावं लागेल, त्यामुळे त्याचा संघाला फायदा होईल. पॅट कमिन्स कदाचित वर्ल्ड कपपूर्वी संपूर्ण हंगामात सर्व टी -20 सामने खेळू शकणार नाही, त्यामुळे मार्शची निवड योग्य असेल. कर्णधार म्हणून मिचचा रेकॉर्ड खूप चांगला आहे, मला वाटते की तो पुढे जाऊन कर्णधार होईल, असा विश्वास रिकी पॉटिंग याने व्यक्त केला आहे. 


दरम्यान, स्टीव्ह स्मिथ मोठा खेळाडू आहे. त्याला अनेक सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्याच्या या अनुभवाचा फायदा ऑस्ट्रेलियाला नक्की मिळेल. स्टीव्ह स्मिथला नक्की संघात जागा मिळेल, पण मला वाटत नाही की तो प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल, असंही रिकी म्हणतो. न्यूझीलंडविरुद्ध त्याला काहीवेळी ओपनिंग करण्याचा संधी मिळाली, पण त्याला प्रत्येक सामन्यात खेळवता आलं नाही, त्यामुळे सिलेक्टर्स याचा नक्की विचार करतील, असंही रिकी पॉटिंगने म्हटलं आहे.