Rinku Singh : सध्याच्या आयपीएलमध्ये इतर खेळांडूंपेक्षा रिंकू सिंहच्या ( Rinku Singh ) नावाची प्रचंड चर्चा होताना दिसतेय. गुजरातविरूद्ध ( Gujarat Titans ) लगावलेले 5 सिक्स अजूनही क्रिकेट प्रेमींच्या लक्षात आहेत. केकेआरच्या ( Kolkata Knight Riders ) शेवटच्या साखळी सामन्यात देखील रिंकूने अथक प्रयत्न केले. मात्र यावेळी त्याला टीमला विजय मिळवून देता आला नाही. दरम्यान या सामन्यानंतर रिंकूचा ( Rinku Singh ) एक फोटो प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. या फोटोमध्ये एक मुलगी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमध्ये गुजरातविरूद्धचा ( Gujarat Titans ) सामना जिंकवून देऊन एक उत्तम फिनीशर म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. नुकतंच आयपीएलमध्ये केकेआरने आपला गाशा गुंडाळल्यानंतर रिंकूने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एका महिलेसोबत फोटो पोस्ट केला आहे. ही महिला दुसरी-तिसरी कोणीही नसून केकेआरचा कर्णधार नितीश राणाची ( Nitish Rana ) पत्नी आहे. 


साचीसोबत रिंकूचा फोटो होतोय व्हायरल


रिंकूने स्वतः नितीशची ( Nitish Rana wife ) पत्नी साची मारवाहसोबतचा ( Saachi Marwah ) फोटो पोस्ट केला होता. यावेळी त्याने फोटोमध्ये साचीला देखील टॅग केलं आहे. या फोटोमध्ये साचीने रिंकूच्या खांद्यावर डोकं ठेवलं आहे. याशिवाय साचीने देखील हा फोटो तिच्या स्टोरीवर शेअर केलाय. दरम्यान यावरून आता रिंकू आणि साचीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येतंय. 


सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया


हा फोटो पाहताच चाहत्यांनी विविध अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये एकाच्या म्हणण्यानुसार, रिंकू सिंह हा पुढचा मुरली विजय बनणार आहे. तर सोशल मीडियावर एका युझरने, कर्णधाराच्या पत्नीला फिरवतोय, असं म्हटलंय. तर काही युझर्सने चट मंगनी पट ब्याह, असंही म्हटलंय. 


मिडीयाशी बोलताना रिंकू सिंग म्हणाला की, मी सध्या भारतीय टीममधील निवडीबाबत विचार करत नाहीये. मुळात माझ्या हातात असलेल्या गोष्टींवर मी मेहनत करत राहीन. आयपीएलमधील केकेआरचा शेवटचा सामना संपल्यानंतर टीम इंडियासाठी निवडीबद्दल रिंकूला प्रश्न विचारण्यात आला होता.







कोण आहे साची?


कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाची पत्नी साची मारवाह  ( Saachi Marwah ) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. साची मारवाह अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस आहे. साचीने अंसल युनिव्हर्सिटीच्या सुशांत स्कूल ऑफ डिझाइनच्या फॅकल्टीमधून तिचं शिक्षण पूर्ण केलंय. ती व्यवसायाने इंटिरियर डिझायनर आहे.


कशी झाली साची आणि नितीशची ओळख?


साची आणि नितीशची लव्ह स्टोरी कोणत्या फिल्मपेक्षा कमी नाहीये. सांची आणि नितीशची लव्हस्टोरी फुटबॉलच्या मैदानावर सुरू झाली. साची नितीशच्या भावासोबत फुटबॉल खेळायची. या दोघांची फुटबॉलच्या मैदानावर झाली आणि मग त्याचं रूपांतर प्रेमात झालं.