Rishabh Pant Car Accident CCTV Footage : टीम इंडियाचा (team India) स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याच्या कारला भीषण अपघात झाला. (Rishabh Pant Car Accident) रुरकीच्या नरसन सीमेवर हम्मादपूर गावाजवळ पंत यांची कार रेलिंगला जोरात धडकली. अपघातानंतर या कारने पेट घेतला. शुक्रवारी झालेल्या भीषण अपघातात ऋषभ पंत थोडक्यात बचावला. पंतला अपघातात गंभीर जखमी झाला असून दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  त्यांच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋषभ पंतने वेळीच गाडीतील खिडकीच्या काचा फोडल्या अन् बाहेर आला म्हणून थोडक्यात अनर्थ टळला. यावेळी पंत दिल्लीहून रुरकी येथील त्यांच्या घरी जात होता. गाडीत तो एकटाच होता. अपघातानंतर त्यांना डेहराडून येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. दुखापतीमुळे त्याच्यावर शस्त्रक्रियाही होऊ शकते. नुकताच तो बांगलादेशहून भारतीय संघासोबत मालिका खेळून परतला आहे. दुबईमध्ये एका कार्यक्रमादरम्यान तो एमएस (ms dhoni) धोनीसोबत दिसला होता.


दरम्यान, 25 वर्षीय भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतचा ( #RishabhPant) आज (30 डिसेंबर) पहाटे 5.30 वाजता अपघात झाला. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांची कार रेलिंगला धडकली आणि त्यानंतर तिला आग लागली. आईला सरप्राईज देण्यासाठी तो एकटाच घरी जात होता. अशा परिस्थितीत लवकरच मैदानात परतणे त्याच्यासाठी सोपे जाणार नाही. कारण टीम इंडियाला 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिका खेळायची आहे. मात्र, दुखापतीमुळे तो या मालिकेतून बाहेर आहे. तो एनसीएमध्ये जाणार होता, पण आता अपघातामुळे त्याला बराच काळ बाहेर राहावे लागू शकते.


फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाकडून मालिका


श्रीलंका मालिकेनंतर (sl vs ind) भारताला न्यूझीलंडकडून मायदेशात वनडे आणि टी-20 मालिका खेळायची आहे. यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांची कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप पाहता ही मालिका टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. पंतचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा रेकॉर्डही चांगला आहे. पण आता तो या मालिकेत क्वचितच प्रवेश करू शकणार नाही. मात्र आता बीसीसीआयला त्याचा पर्याय शोधावा लागणार आहे. दरम्यान ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर युवा क्रिकेटपटू पंतची नजर असेल. त्याआधी त्याला पूर्णपणे तंदुरुस्त परत यायचे आहे. 2011 पासून भारत विश्वचषक ट्रॉफीची वाट पाहत आहे.