PBKS vs DC, IPL 2024 : पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (Punjab Kings vs Delhi Capitals) यांच्यात आयपीएलचा दुसरा सामना खेळवला जात आहे. महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवल्या जात असलेल्या सामन्यात 15 महिन्यानंतर ऋषभ पंत (Rishabh Pant) मैदानात खेळताना दिसला. 455 दिवसापूर्वी ऋषभ पंतचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये ऋषभ गंभीररित्या जखमी झाला होता, त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील झाली होती. अशातच आता ऋषभ मैदानात परतला आहे. अपघातानंतरच्या पहिल्या सामन्यात ऋषभने 13 बॉलमध्ये 18 धावांची खेळी केली. मात्र, एका बॉलवर चुकीचा शॉट खेळल्याने ऋषभला विकेट गमवावी लागली. त्यावेळी ऋषभला संताप अनावर झाल्याचं दिसून आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉस जिंकून पंजाब किंग्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दिल्लीच्या सलामीच्या फलंदाजांनी हा निर्णय पंजाबच्या पथ्यावर पडू दिला नाही. वॉर्नर आणि मिशेल मार्श यांनी आक्रमक फलंदाजी केली. मिशेलचं वादळ अर्शदीपने शमवलं. मात्र, 8 व्या ओव्हरपर्यंत दिल्लीने 74 धावा स्कोरबोर्डवर लावल्या होत्या. 8 व्या ओव्हरच्या अखेरच्या बॉलवर डेव्हिड वॉर्नर बाद झाला अन् ऋषभ पंतने मैदानात पाऊल ठेवलं. ऋषभ मैदानात आल्यानंतर स्टेडियममधील उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी उभं राहुन टाळ्या वाजवल्या. 



ऋषभने पहिल्या बॉलपासून आक्रमक फलंदाजीला सुरूवात केली. तो अपघातातून पुनरागमन करतोय, असं कोणालाही वाटत नव्हतं. ऋषभ बॉलवर डोळे कोरत असताना पंजाबच्या गोलंदाजांनी बॉऊंसर सुरू केले. 13 व्या 4 थ्या बॉलवर हर्षल पटेल ऋषभला एक बॉऊंसर टाकला अन् ऋषभने इथंच चूक केली. बॉलच्या स्पीडचा अंदाज न आल्याने ऋषभने अप्पर कट मारण्याचा प्रयत्न केला अन् जॉनी बेअरस्टोच्या हातात एक सिंपल कॅच आला. आऊट झाल्यानंतर ऋषभ नाराज दिसला. त्यावेळी त्याने पॅडवर बॅट आदळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने अखेर बॅट रोखली. दिल्लीने पहिल्या डावात 20 ओव्हरमध्ये 174 धावा कुटल्या आहेत.



दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, शाई होप, ऋषभ पंत (C), रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद, इशांत शर्मा.


पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (C), जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, शशांक सिंग.