Rishabh Pant : बंगळूरूच्या चिन्नस्वामी मैदानावर दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू (Royal Challengers Bangalore) यांच्यामध्ये सामना रंगलाय. या सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान दिल्लीचा आजचा पाचवा सामना असून यंदाच्या सिझनमध्ये पहिला विजय मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न दिल्ली करणार आहे. दिल्लीला अजून एकही विजय नोंदवता आलेला नाही. अशा परिस्थितीत टीमचा नियमित कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) ने शुक्रवारी दिल्लीच्या खेळाडूंची भेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजून एकाही विजयाची नोंद न झाल्याने चाहते काहीसे निराश असून ऋषभ पंत (Rishabh Pant) ला मिस करतायत. अशामध्ये शुक्रवारी दिल्लीची टीम ग्राऊंडवर प्रॅक्टिस करत असताना पंतने खेळाडूंची भेट घेतली. यावेळी त्याने खेळाडूंना खास गुरुमंत्र देखील दिलाय.


अपघातामुळे पंत आयपीएलमधून बाहेर


गेल्या वर्षी डिसेंबरच्या महिन्यात ऋषभ पंतचा भीषण अपघात झाला होता. यानंतर त्यावर काही शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यानंतर पंत यामधून रिकव्हर होत असल्याने आयपीएलमधून तो बाहेर झालाय. मात्र चाहते त्याची आतुरतेने वाट पाहतायत. 


अशातच आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी पंत थेट मैदानात उतरला होता. यावेळी त्याने प्रॅक्टिस सेशनमध्ये असलेल्या खेळाडूंशी चर्चा केली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


दिल्ली कॅपिटल्सच्या अधिकृत हँडलवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये पंत म्हणतोय की, माझी तब्येत ठीक असून मी बरा होतोय. यावेळी मी एनसीएमध्ये आलो असताना या ठिकाणी माझे सर्व मित्र प्रॅक्टिस करत होते. यानंतर मी त्यांना भेटलो. मी क्रिकेटला खूर मिस करतोय.



पंत पुढे म्हणाला, माझं हृदय आणि आत्मा नेहमी दिल्ली संघासोबत असणार आहे. या अशा गोष्टी आहेत, ज्या मी कंट्रोल करू शकत नाहीये. यावेळी मी मित्राला सांगितलं की, तू चांगली खेळी करतोय, पण नेटमध्येच इतकी चांगली करू नकोस. मला आशा आहे मी लवकरच बरा होऊन कमबॅक करेन. 


चाहते पंतला करतायत मिस


ऋषभ पंत आयपीएल खेळत नसल्याने दिल्लीच्या टीमची कमान ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नरकडे सोपवण्यात आली आहे. मात्र अजूनही त्यांना पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. अशातच दिल्लीचे चाहते नियमित कर्णधार पंतला मिस करतायत. शुक्रवारी चाहत्यांसाठी आणि टीमला सपोर्ट करण्यासाठी पंत मैदानात उतरला होता. पंतने दिल्ली कॅपिटल्सच्या ट्रेनिंग सेशनमध्ये खेळाडूंची भेट घेतली.