Rishabh Pant Car Accident: टीम इंडियाचा (Team India) फलंदाज ऋषभ पंतचा (Rishabh Pant) आज भीषण कार अपघात झाला आहे. या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. 25 वर्षांच्या पंतला पुढच्या आठवड्यात होणाऱ्या श्रीलंकेदौऱ्याच्या सिरीजमध्ये समाविष्ट करण्यात आलं नाहीये. मात्र तरीही पुढील काही महिने तो क्रिकेटपासून लांब राहणार आहे. आज झालेल्या अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली आहे. अशातच आता शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि पंतचा एक जुना व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर, मोठ्याचा सल्ला ऐकला पाहिजे असं म्हणतायत. या व्हिडीओमध्ये ऋषभ पंत त्याचा सिनीयर खेळाडू शिखर धवनसोबत बोलताना दिसतोय. यावेळी पंत धवनला विचारतो, मला तू कोणता सल्ला देऊ इच्छितोस? यावर शिखर धवनने त्याने गाडी आरामात चालवत जा, असा सल्ला दिला होता. जर त्याने धवनचा सल्ला मानला असता, तर कदाचित आज पंत हॉस्पिटलमध्ये दाखल नसता.


हा व्हिडीओ 11 सेकंदांचा असून इंडियन प्रीमियर लीग दरम्यानचा आहे. आयपीएलमध्ये शिखर धवन दिल्ली कॅपिटल्स टीमकडून  खेळला आहे. या व्हिडीओमध्ये दोन्ही खेळाडू दिल्ली कॅपिटल्सच्या जर्सी दिसतायत.  



ऋषभ पंतचा कसा झाला अपघात?


घरी परतत असताना पंतची कार रेलिंगला धडकली आणि हा अपघात झाला. रेलिंगला धडक दिल्यानंतर गाडीने पेट घेतला आणि काही वेळातच पंतची गाडी जळून खाक झाली. मुख्य म्हणजे ऋषभ पंत स्वतः गाडी चालवून त्याच्या घरी जात होता. यावेळी त्याला डुलकी लादली आणि गाडीचा अपघात झाला. 


अपघातानंतरचा ऋषभ पंत (Rishabh Pant) चा व्हिडीओ व्हायरल


पंतच्या अपघातानंतर त्याची गाडी आणि त्याचे रूग्णालयातील फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत. यासोबत आता त्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. ज्यामुळे पंतच्या डोक्याला मार लागलेला असून चेहरा संपूर्ण रक्तबंबाळ झाल्याचं दिसतंय. शिवाय त्याच्या गाडीचा अपघात होतानाचं सीसीटीव्ही फुटेजही (Rishabh Pant Car Accident CCTV Footage) समोर आलं आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसून येतंय की, गाडी भरधाव वेगाने येऊन डिव्हायडरला आदळते.


डॉक्टरांनी दिली पंतबद्दल माहिती


डॉक्टर सुशिल नागर (Dr. Sushil Nagar) यांनी सांगितलं की, पहिल्या एक्स रेमध्ये कुठेही फ्रॅक्चर असल्याचं दिसून आलं नाही. ऋषभ पंतला कपाळाला आणि गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. आणि इतक्या आगीतही त्याला कुठेही भाजलेलं नाही. कपाळाला दोन जखमा झाल्या आहेत. एक डाव्या डोळ्याच्या अगदी वर आहे. गुडघ्याला जखम झाली असून जोरदार धक्का बसल्याने पाठीला दुखापत झाली आहे.


आम्ही ऋषभ पंतच्या तब्येतीकडे लक्ष ठेवून आहोत. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. लवकरच बरा होऊन परतेल, असं डीडीसीएचे सेक्रेटरी सिद्धार्थ साहिब सिंग (DDCA Secretary Siddharth Sahib Singh) यांनी सांगतिलं आहे. पंतबाबत सकारात्मक माहिती समोर आल्याने चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.