मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पाचव्या टेस्ट सामन्यात विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने इंग्लिश गोलंदाजांची चांगलीच तारांबळ उडवली. ऋषभ पंतने अवघ्या 89 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं आणि या शतकानंतर सेलिब्रेशन पाहण्यासारखं होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र यामध्येही एक ट्विस्ट आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड जेव्हा फलंदाजी करायचे तेव्हा त्यांना पाहून जल्लोष केला जायचा. दरम्यान यावेळी ऋषभ पंतने 100 रन्स पूर्ण करताच राहुल द्रविड आपल्या भावना रोखू शकला नाही.


ऋषभ पंतचं शतक पूर्ण होताच राहुल द्रविडने खुर्चीवरून उठून दोन्ही हात वर करून त्याचं शतक पूर्ण उत्साहात साजरं केलं. राहुल द्रविडचे सेलिब्रेशन पाहून प्रेक्षकांना मात्र जुना राहुल द्रविड आठवला जेव्हा त्याने 2011 मध्ये इंग्लंडच्या भूमीवर शतक झळकावून असंच काहीसं सेलिब्रेशन केलं होतं.



टीम इंडियाने इंग्लंडमध्ये सिरीद जिंकल्यास प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडसाठीही ही मोठी गोष्ट असेल. यापूर्वी राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इंग्लंडमध्ये मालिका जिंकण्यात यश मिळवलं होतं. अशा स्थितीत राहुल द्रविड इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी उत्सुक आहे.



रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह टीम इंडियाचं नेतृत्व करतोय. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.