`उर्वशी रौतेलासोबत एक फोटो काढ`, टीम इंडियातील `या` खेळाडूकडे चाहत्याची अजब मागणी
विराट कोहलीनंतर त्याने नुकताच आपल्या नव्या लूकचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे.
मुंबई: भारतात क्रिकेट आणि चाहते यांचं नातं अगदी वेगळंच आहे. प्रत्येक क्रिकेटर्सला चाहते हवे असतात मात्र काही वेळा त्यांच्यामुळे काही संकटांचा सामना देखील करावा लागतो. ऋषभ पंत दिल्ली संघाचा IPL 2021च्या 14 व्या पर्वासाठी कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वात दिल्ली संघाने उत्तम कामगिरी केली.
ऋषभ पंतने IPLचे सामने स्थगित झाल्यानंतर आता इंग्लंड दौऱ्याची तयारी सुरू केली आहे. विराट कोहलीनंतर त्याने नुकताच आपल्या नव्या लूकचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या फोटोवर चाहत्यांनी तुफान कमेंट्स केल्या आहेत. एका तरुणीनं तर अजब मागणी देखील पंतकडे लावून धरली आहे. त्यामुळे इतर युझर्सही अवाक झाले.
अनेकांनी ऋषभ पंतचा हा लूक के एल राहुलशी थोडासा जुळता असल्याचं म्हटलं आहे. तर एका तरुणीनं उर्वशीसोबत तू फोटो काढ अशी अजब मागणी केली आहे. ऋषभच्या या फोटोला 57 हजारहून अधिक लाईक्स आणि हजारहून अधिक चाहत्यांनी कमेंट्स शेअर केल्य़ा आहेत.
विराट कोहलीकडून टीम इंडियातील 'या' खेळाडूची नक्कल, व्हिडीओ
ऋषभने आतला आवाज ऐका असं कॅप्शन देऊन सूट घातलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ह्या फोटोला युझर्सनी खूप पसंती दिली आहे. ऋषभ पंत टीम इंडियामधील A टीममध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी सिलेक्ट झाला आहे. 2 जूनला इंग्लडसाठी रवाना होणार आहे. 18-22 जून दरम्यान टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. त्यानंतर 4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध कसोटी सीरिज खेळणार आहेत.