Rishabh Pant Health Update: टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंतसंदर्भात (Rishabh Pant) एक बातमी समोर आली आहे. ऋषभ पंतचा 30 डिसेंबर 2022 रोजी भीषण अपघात (Rishabh Pant Accident) झाला. या अपघातामध्ये पंत गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळेच पंत यंदाच्या इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) एकही सामना खेळणार नाही. पंत यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघाकडून खेळताना दिसणार नाही. त्यामुळेच आता पंत पुन्हा एकदा कधी मैदानावर दिसणार असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. पंतचं पुनरागमन कधी होणार हा प्रश्न च्र्चेत असताना भारताच्या एका माजी कर्णधाराने पंत पुन्हा मैदानात दिसण्यासंदर्भात सूचक विधान केलं आहे. या विधानावरुन पंत बराच काळ, कदाचित काही वर्ष क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणार की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.


कोण आणि नेमकं काय म्हणालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमधील (IPL) 'दिल्ली कॅपिटल्स'च्या (Delhi Capitals) निर्देशकपदी असलेल्या सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) पंतसंदर्भात विधान केलं आहे. सध्या पंतची जागा दिल्लीच्या संघात कोण घेऊ शकतं याचा शोध घेणे आणि पर्याय म्हणून योग्य खेळाडू निवडणे हे गांगुलीसमोरील सर्वात मोठं आव्हान असणार आहे. पंतच्या अपघातानंतर त्याच्यावर मुंबईत शस्त्रक्रीया झाली असून सध्या तो रिकव्हरी फेजमध्ये आहे. गांगुलीने याच पार्श्वभूमीवर पंतबरोबर आपलं बोलणं झालं असल्याचं सांगितलं. या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेमध्ये पंत खेळणार की नाही यासंदर्भातील प्रश्न गांगुलीला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना गांगुलीने किमान 2 वर्ष यासाठी लागू शकतात असं म्हटलं. "मी त्याच्याशी अनेकदा चर्चा केली आहे. हे जाहीर आहे की जखमा आणि त्यानंतर झालेल्या ऑप्रेशननंतर तो सध्या कठीण काळातून जात आहे. त्याला लवकर बरं वाटावं म्हणून मी प्रार्थना करतो. एक वर्ष किंवा काही वर्षांमध्ये तो कदाचित पुन्हा भारतासाठी खेळू शकेल," असं गांगुली म्हणाला. यावरुन पंत एवढ्या लवकर बरा होऊन मैदानात उतरण्याची चिन्हं फारच धुसर असून पंतला रिकव्हर होण्यासाठी अपघातानंतर एका वर्षाहून अधिक कालावधी लागू शकतो असे संकेत गांगुलीने त्याच्याशी चर्चा केल्यानंतर दिले आहेत. गांगुलीने तर काही वर्ष असा उल्लेख करत हा कालावधी एका वर्षाहूनही अधिक असू शकतो असंही सूचकपणे म्हटलं आहे.


काही काळ पंत संघाबरोबर दिसणार का?


पंत यंदाच्या पर्वामध्ये काही काळ संघासोबत दिसू शकेल का? असं झाल्यास त्याला या दुखापतीमधून सावरण्यास मदत होईल. खरोखर हे असं चित्र तुम्हाला पहायला आवडेल का? असा प्रश्न गांगुलीला पत्रकारांनी विचारला. "मला ठाऊक नाही. आम्ही पाहू यासंदर्भात काही होतंय का," असं फारच वरवरचं उत्तर गांगुलीने दिलं. दिल्लीच्या टीमने अद्याप पंतला पर्याय कोण याची घोषणा केलेली नाही. तरुण खेळाडू अशी ओळख असलेला अभिषेक पोरेल आणि अनुभवी शेल्डन जॅक्सन या दोघांपैकी उत्तम कोण आहे हे अद्याप संघाला निश्चित करता आलेलं नाही. डेव्हिड वॉर्नरकडे संघाचं नेतृत्व सोपवलं जाण्याची शक्यता आहे. अक्षर पटेलच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.


दिल्लीचा सराव सुरु


गांगुलीच्या मार्गदर्शनाखाली कोलकात्यामध्ये दिल्लीच्या संघाचं तीन दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. यामध्ये पृथ्वी साव, इशांत शर्मा, चेतन सकारिया, मनीश पांडे याशिवाय अन्य घरगुती क्रिकेट स्पर्धा खेळणाऱ्या खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. सौरव गांगुलीने, "आयपीएलला अजून एका महिन्याचा वेळ आहे. आताशी सराव सत्र सुरु झालं आहे. जेवढं क्रिकेट सध्या खेळवलं जात आहे ते पाहात सर्व खेळाडूंना एकत्र आणणं कठीण आहे. 4 ते 5 खेळाडू इराणी चषक खेळत आहे. सरफराजच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्याचं बोट फ्रॅक्चर झालेलं नाही. तो आयपीएलच्या आधी बरा होईल अशी अपेक्षा आहे," असं गांगुली म्हणाला.