मुंबई : दिल्ली टीमचा कर्णधार ऋषभ पंत गेल्या दिवसांमध्ये खूप चर्चेत आहे. पुन्हा पंतने चिडीचा डाव खेळला का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. राजस्थान विरुद्धच्या सामन्यानंतर पुन्हा कोलकाताच्या मॅचमध्ये नो बॉलचा ड्रामा रंगल्याचं पाहायला मिळला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतने मैदानात पुन्हा एकदा नो बॉलवरून हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. राजस्थान विरुद्ध सामन्यानंतर मोठा आर्थिक फटका बसूनही पंत सुधारला नाही. त्याने पुन्हा कोलकाता विरुद्ध सामन्यात राडा केला. त्यामुळे आता पंतवर काय कारवाई होणार हे पाहावं लागणार आहे. 


नो बॉलवरून पुन्हा वाद


ललित यादवने फुल टॉस बॉल टाकला. त्याला अंपायरने नो बॉल दिला. अंपायरच्या या निर्णयावरून ऋषभ पंत पुन्हा भिडला. याचं कारण म्हणजे राजस्थान विरुद्धच्या सामन्यात पंतला फुल टॉस बॉल असून नो बॉल दिला नव्हता. आता नो बॉल दिला त्यामुळे पंत अंपायरशी भिडला. 


रीप्लेमध्ये पाहिल्यानंतर ललित यादवने टाकलेला बॉल हा नितीश राणाच्या कमरेवरून जाणारा होता. तो नो बॉल असल्याचा निर्णय अंपायरने योग्य दिला होता. अंपायरशी तरीही ऋषभ पंत भांडताना दिसला. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्यावरून वाद होत आहे.