हायव्होल्टेज ड्रामानंतर कॅप्टन पंतला मोठा दणका, सुनावली मोठी शिक्षा
आताची सर्वात मोठी बातमी, कॅप्टन ऋषभ पंतसह 2 जणांवर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई
मुंबई : आताची सर्वात मोठी बातमी येत आहे. राजस्थान विरुद्ध सामन्यात रंगलेल्या हायव्होल्टेज ड्रामानंतर कॅप्टन पंतला मोठा दणका मिळाला आहे. आधी असिस्टंट कोचनं सर्वांसमोर मैदानात शाळा घेतली. त्यानंतर त्याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली.
ऋषभ पंतसोबत शार्दूल ठाकूर आणि प्रवीण आम्रे यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. आयपीएलच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
ऋषभ पंतवर लेव्हल 2 मधील कलम 2.7 नियमाचं उल्लंघन केल्या प्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. या दोघांनी आपली चूक मान्य केली असून मॅच फीमधील 100 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.
शार्दूल ठाकूरने कलम 2.8 नियमाचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. हा आरोप त्याने मान्यही केला. त्याला मॅच फीमधील 50 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.
असिस्टंट कोच प्रवीण आम्रे मैदानात उतरल्याने त्यांच्यावर एक मॅचसाठी बंदी लावण्यात आली. याशिवाय त्यांना 100 टक्के फीची रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.