Video: ऋषभ पंतचा `हवाई हल्ला`! खेळपट्टीवर पडून मारला अप्रतिम षटकार, ऑस्ट्रेलिया पाहतच राहिला
Rishabh Pant Smashed Extraordinary Six: ऋषभ पंतने आपल्या खेळीदरम्यान असा षटकार मारला की गोलंदाजी करणारा पॅट कमिन्सही त्याचा प्रेक्षक बनला. ऋषभ पंतच्या षटकाराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Rishabh Pant Viral Six: टीम इंडियाचा दमदार यष्टीरक्षक फलंदाज म्हणजे ऋषभ पंत. ऋषभने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आपल्या फलंदाजीने चाहत्यांना आश्चर्यचकित केले. 27 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने भलेही 78 चेंडूत 37 धावा केल्या असतील, पण त्याच्या खेळण्याच्या शैलीने त्याच्या प्रतिस्पर्ध्यांनाही आश्चर्यचकित केले. या काळात ऋषभ पंतने 47.44 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत 3 चौकार आणि 1 षटकार लगावले. फलंदाजीदरम्यान ऋषभ पंतच्या एका कृतीने ऑस्ट्रेलियन समालोचकही हैराण झाले होते.
ऋषभ पंतने पर्थमध्ये मारला दमदार षटकार
ऋषभ पंतने आपल्या खेळीदरम्यान असा षटकार मारला की गोलंदाजी करणारा पॅट कमिन्सही त्याचा प्रेक्षक बनला. ऋषभ पंतचा 'एअर स्ट्राइक' पाहून सगळेच अवाक् झाला आहे. ऋषभ पंतच्या या षटकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नक्की काय झालं?
भारताच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स 42 व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आला होता. पॅट कमिन्सच्या या षटकातील शेवटच्या चेंडूवर ऋषभ पंतने जमिनीवर पडून षटकार ठोकला.
बघा ऋषभ पंतचा एअर स्ट्राइक!
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
ऑस्ट्रेलियन समालोचकही झाले आश्चर्यचकित
ऋषभ पंत मारलेला षटकाराचा चेंडू सीमारेषा ओलांडताच प्रेक्षकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ऋषभ पंतने मारलेला हा अप्रतिम षटकार पाहून स्टेडियममध्ये उपस्थित असलेले चाहते, ऑस्ट्रेलियन समालोचक आणि भारतीय समालोचकही आश्चर्यचकित झाले. ऑस्ट्रेलियन कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स सुद्धा ऋषभ पंतचा षटकार पाहून अचंबित झाला. पॅट कमिन्स प्रेक्षकासारखा तो षटकार पाहत राहिला. ऋषभ पंतकडे फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजांविरुद्ध धावा करण्याचे अप्रतिम तंत्र आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये T20 शैलीची फलंदाजी
ऋषभ पंत फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजांविरुद्ध प्रभावीपणे खेळतो हे वेळोवेळी दिसून आले आहे. ऋषभ पंत चौकार आणि षटकार मारून विरोधी संघावर दबाव आणतो. ऋषभ पंतचा कसोटी सामन्यातील सर्वोत्तम धावसंख्या १५९ धावा आहे. ऋषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये T20 शैलीत फलंदाजी करतो. ऋषभ पंतने टीम इंडियासाठी जगभरातील अनेक कठीण मैदानांवर अनेक मॅच विनिंग इनिंग खेळल्या आहेत. ऋषभ पंतने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांमध्ये कसोटी शतके झळकावली आहेत.