'विराटने आता थांबायला हवं...'; बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये फक्त 5 धावांवर बाद झाल्याने कोहली ट्रोल

Virat Kohli Brutally Trolled: सध्या सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात विराट कोहली केवळ पाच धावांवर बाद झाला आहे. 

तेजश्री गायकवाड | Updated: Nov 22, 2024, 10:21 AM IST
'विराटने आता थांबायला हवं...'; बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये फक्त 5 धावांवर बाद झाल्याने कोहली ट्रोल title=
Photo Credit: X

IND vs Aus 1st Test BGT 2024-25: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची खराब धावांचा खेळ सुरूच आहे. आज 22 नोव्हेंबर, शुक्रवारी पर्थ येथे सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात कोहली केवळ पाच धावांवर बाद (Virat Kohli Out)  झाला. विराट कोहली पर्थमध्ये आल्यापासून, ऑस्ट्रेलियन मीडिया आउटलेटच्या एका गटाने त्याला एका विशेष अंकाच्या पहिल्या पानावर झळक्याने तो चर्चेत आहे. 2024 मध्ये खेळाच्या सर्वात प्रदीर्घ फॉर्मेटमध्ये निराशाजनक फॉर्म असूनही अनेक माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी कोहलीबद्दल खूप छान बोलले.  बॉर्डर-गावसकर स्पर्धेत सर्वात वाईट सुरुवातीनंतर या स्टार फलंदाजाला ट्रोल करण्यात आले आहे. कोहलीच्या विकेटने भारताला मोठ्या दबावाखाली आणेल आहे. याआधी  यशस्वी जैस्वाल आणि देवदत्त पडिक्कल शून्यावर बाद झाले. त्यानंतर केएल राहुल 74 चेंडूंचा सामना केल्यानंतर 26 धावा करून बाद झाला. 

सोशल मीडियावर लोकांनी व्यक्त केली नाराजी 

 

24 षटकांनंतर भारताची धावसंख्या किती?

24 षटकांनंतर भारताची धावसंख्या 4 विकेट गमावून 47 धावा आहे. ध्रुव जुरेल (0 धावा) आणि ऋषभ पंत (10 धावा) क्रीजवर आहेत. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने आतापर्यंत 2 बळी घेतले आहेत. त्याचबरोबर मिचेल स्टार्कने 2 विकेट्स घेतल्या आहेत.

 

 

कशी आहे भारताची प्लेइंग इलेव्हन?

केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (w), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (क), मोहम्मद सिराज.

कशी आहे ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन? 

उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (डब्ल्यू), पॅट कमिन्स (सी), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवुड

कोणत्या टीव्ही चॅनलवर बघता येईल हा  सामना?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचे प्रसारण करण्याचे अधिकार स्टार स्पोर्ट्सकडे आहेत.

पहिल्या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे बघता येईल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना डिस्ने हॉटस्टार ॲपवर (Disney+ Hostar) ऑनलाइन पाहता येईल.