Video: टीम इंडिया ठरली पर्थमध्ये 'फाऊल प्ले'ची शिकार! केएल राहुल नाबाद होता? ऑस्ट्रेलियावर झाला बेईमानीचे आरोप

IND vs Aus 1st Test Perth KL Rahul Controversy: केएल राहुल नाबाद होता असे म्हणत ऑस्ट्रेलियावर बेईमानीचे आरोप होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओचं संपूर्ण सत्य काय आहे ते जाणून घ्या... 

तेजश्री गायकवाड | Updated: Nov 22, 2024, 12:07 PM IST
Video: टीम इंडिया ठरली पर्थमध्ये 'फाऊल प्ले'ची शिकार! केएल राहुल नाबाद होता? ऑस्ट्रेलियावर झाला बेईमानीचे आरोप  title=
Photo Credit: X

KL Rahul Wiket Controversy Video Viral:  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला आज शुक्रवारी 22 नोव्हेंबरला पर्थमध्ये सुरुवात झाली.  भारताचा कार्यवाहक कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. दुपारच्या जेवणाच्या ब्रेकपर्यंत   पहिल्या दिवशी भारतीय टीमने 51 धावांत 4 गडी गमावले. यशस्वी जैस्वाल आणि देवदत्त पडिक्कल यांना खातेही उघडता आले नाही.  विराट कोहली फक्त ५ धावा करून बाद झाला. केएल राहुल 26 धावा करून बाद झाला. केएल राहुलच्या विकेटने मालिकेच्या पहिल्याच दिवशी मोठा वाद झाला आहे. 

केएल राहुलला नाबाद असल्याची सोशल मीडियावर चर्चा 

केएल राहुलला आऊट दिल्यानंतर सोशल मीडियावर चाहते पंचांवर खूप संतापले आहेत . नेहमीप्रमाणे ऑस्ट्रेलियात भारतीय संघाशी अप्रामाणिकपणा सुरू झाला, असेही सोशल मीडियावर वापरकर्ते म्हणत आहेत. 22 व्या षटकापर्यंत भारतीय संघाने 3 गडी गमावून 47 धावा केल्या होत्या. विराट कोहली, यशस्वी जैस्वाल आणि देवदत्त पडिक्कल यांनी निराशजनक कामगिरी केली. नंतर 23व्या षटकात मिचेल स्टार्क गोलंदाजी करायला आला आणि षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर केएल राहुलला झेल घेऊन बाद केले.  

हे ही वाचा: 'विराटने आता थांबायला हवं...'; बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये फक्त 5 धावांवर बाद झाल्याने कोहली ट्रोल

 

 

नक्की काय झालं? 

23व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर राहुल जेव्हा मिचेल स्टार्कचा बळी ठरला. ही विकेट पडली तेव्हा त्यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. ॲलेक्स कॅरीने केएल राहुलला झेलबाद केले. आधी मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद घोषित केले. नाबाद घोषित केल्यावर ऑस्ट्रेलियन संघाने रिव्ह्यू घेतला. तिसऱ्या पंचाने हा निर्णय पालटवला आणि राहुलला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. यावेळी राहुल थर्ड अंपायरच्या निर्णयावर तो खूश नव्हता.     

 

हे ही वाचा: IND vs AUS BGT: अश्विन-जडेजा बाहेरचा रस्ता दाखवून 'या' दोन खेळाडूंनी केले पहिल्या कसोटीत भारताकडून पदार्पण

 

 

हे ही वाचा: IND vs AUS BGT: भारताचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय, 'अशी' आहे प्लेइंग-11

थर्ड अंपायरने केली मोठी चूक? 

रिव्ह्यू  घेतल्यानंतर आता तिसऱ्या पंचाला बघायचे होते की बॅट पॅडला लागली की बॉलला. कुठून तरी आवाज आल्याचे स्निकोमीटरमध्ये स्पष्टपणे दिसून आले.  तिसऱ्या पंचाने पाहिलेल्या रिप्लेमध्ये बॅट पॅडच्या जवळ आहे की नाही हे स्पष्ट झाले नाही. असे असतानाही त्याने राहुलला बाद केले. या निर्णयाने राहुल आश्चर्यचकित झाला. पॅव्हेलियनमध्ये परतताना तो नाखूष दिसत होता आणि नकारार्थी मान हलवत होता. राहुल 74 चेंडूत 26 धावा करून बाद झाला. तो एकमेव फलंदाज होता जो आज ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा जोरदार सामना करत होता. थर्ड अंपायरच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर चाहते संतापले. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x