Duleep Trophy 2024 : ऋषभ पंत नाही... हा तर `सुपरमॅन`, विकेट मागे राहून पकडला अफलातून कॅच, पाहा Video
भारताचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतने इंडिया बी कडून खेळताना सर्वांना इम्प्रेस केले. पंतने सामन्याच्या दरम्यान विकेटच्या मागे उभं राहून एक अफलातून कॅच पकडला. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Duleep Trophy 2024 : दुलीप ट्रॉफी 2024 ला 5 सप्टेंबर पासून सुरुवात झाली असून यात सध्या इंडिया ए विरुद्ध इंडिया बी यांच्यात पहिला सामना खेळवला जात आहे. बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर दुलीप ट्रॉफीचा हा सामना खेळवला जात असून हा सामना इंडिया बीने जिंकला आहे. इंडिया बी 76 धावांनी हा सामना जिंकला. या सामन्याचा हिरो इंडिया बी चा मुशीर खान ठरला, ज्याने पहिल्या इनिंगमध्ये 181 धावांची खेळी केली. मुशीर खान याला प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्डने सुद्धा सन्मानित करण्यात आले. भारताचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतने इंडिया बी कडून खेळताना सर्वांना इम्प्रेस केले. पंतने सामन्याच्या दरम्यान विकेटच्या मागे उभं राहून एक अफलातून कॅच पकडला. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऋषभ पंतने घेतला अफलातून :
इंडिया ए च्या दुसऱ्या इनिंगमध्ये 51 वी ओव्हर इंडिया बी चा गोलंदाज नवदीप सैनी याने टाकली. ओव्हरच्या चौथ्या बॉलवर आवेश खान स्ट्राईकवर होता. नवदीपने आवेश खानला बॉल टाकला. आवेश खानने बॉल हलका हिट करून विकेटच्या मागे मारला. परंतु जेव्हा त्याने शॉर्ट खेळला तेव्हा विकेटच्या मागे उभा असलेल्या ऋषभ पंतने हवेत उडी मारून हा कॅच पकडला. त्यामुळे आवेश खान हा केवळ 3 धावा करून बाद झाला.
हेही वाचा : टीम इंडियाचा प्रिन्स, 25 व्यावर्षी कमावली करोडोंची संपत्ती, लग्झरी गाड्यांचं कलेक्शन तर पाहातच राहाल
पाहा व्हिडीओ :
ऋषभ पंतने केलं अर्धशतक :
पहिल्या इनिंगमध्ये ऋषभ पंत केवळ 7 विकेट्स करू शकला होता. परंतु दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने जबरदस्त फलंदाजी करून अर्धशतकं ठोकले. पंतने 34 बॉलमध्ये 50 धावा केल्या. ऋषभ पंतने 129 स्ट्राईक रेटने 9 चौकार आणि 2 षटकार ठोकले.