दिल्ली : टीम इंडिया सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. यावेळी कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत असलेला सामना टीम इंडियाने गमावला आहे. टीम इंडियाचा सामना भलेही हरला असेल, पण स्फोटक फलंदाज ऋषभ पंतने आपल्या खेळाने सर्वांची मनं जिंकण्यात यश मिळवलं. पंतची लाईफस्टाइलही खूप चर्चेत आहे. त्याची एकूण संपत्ती जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.


कोटींच्या संपत्तीचा मालक आहे पंत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋषभ पंतने वयाच्या 24 व्या वर्षी टीम इंडियामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केलीये. त्याला नुकतंच दक्षिण आफ्रिकेत टीमचं कर्णधारपदही देण्यात आलं होतं.


तरुण वयात कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचा तो मालक आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2021 मध्ये पंतची एकूण संपत्ती भारतीय रुपयांनुसार 39 कोटी रुपये होती, तर आता ऋषभ पंतची एकूण संपत्ती सुमारे 66.42 कोटी रुपये झाली आहे.



महागड्या गाड्यांचा शौकीन 


Rishabh Pant कडे अनेक आलिशान गाड्या आहेत. पंतच्या कार कलेक्शनमध्ये Audi A8, Merecedez आणि Ford या महागड्या गाड्यांचा समावेश आहे. ज्याची किंमत 1.80 कोटी, 2 कोटी आणि 95 लाख इतकी आहे.


ऋषभ पंतचं हरिद्वार, उत्तराखंडमध्ये एका आलिशान डिझायनर घर आहे. पंतांच्या घरातील खोल्या मोठ्या असून  उत्तम असं फर्निचर देखील आहे. दुसरीकडे, बेडरूममध्ये मॉडर्न आऊटलेट वॉल पेंटिग्ज आहेत. पंतच्या कुटुंबात बहीण साक्षी आणि आई सरोज यांचा समावेश आहे.