IPL 2023: Rishabh Pant च्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, Ricky Ponting सांगितलं कधी खेळणार?
Ricky Ponting, Rishabh Pant : आता ऋषभ मैदानात उतरणार तरी कधी?, असा सवाल विचारण्यात येत आहे. त्यामुळे आता दिल्ली कॅपिटल्स (DC) नाही तर टीम इंडियाला देखील आगामी वर्ल्ड कपमध्ये (ODI World Cup 2023) ऋषभची उणिव भासेल.
Rishabh Pant, IPL 2023 : टीम इंडिया (Team India) आणि दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) कर्णधार आणि विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत गेल्या महिन्यात कार अपघातात गंभीर जखमी (rishabh pant accident) झाला होता. सध्या त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत. ऋषभच्या गुडघ्याचे तीन लिगामेंट टिअर झाल्यामुळे पूर्णपणे फिट व्हायला बराच काळ लागणार आहे. अशातच आता ऋषभ आयपीएलचा आगामी (IPL 2023) हंगाम खेळणार की नाही?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय. अशातच आता दिल्ली कॅपिटल्सचा कोच रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) मोठं विधान केलंय. (Rishabh Pant to take part in IPL 2023 Delhi Capitals head coach Ricky Ponting makes big statement marathi news)
काय म्हणाला Ricky Ponting ?
मला हंगामातील (IPL) प्रत्येक दिवशी पंत माझ्यासोबत डग आऊटमध्ये हवा आहे. जर तो आयपीएल दरम्यान आमच्यासोबत प्रवास करू शकत असेल तर मला त्याला डग आऊटमध्ये पाहायला आवडेल. त्याच्या उपस्थितीचा संघावर सकारात्मक परिणाम होतो, असं मोठं वक्तव्य रिकी पाँटिंगने (Ricky Ponting On Rishabh Pant) केलं आहे.
ऋषभ पंतसारखे (Rishabh Pant) खेळाडू झाडावर उगवत नाही. आम्हाला ते पारखी नजरेनं शोधून आणावं लागतं आणि त्यांच्यातील टॅलेंटला योग्य दिशा दिल्यास चांगले खेळाडून निर्माण होतात. आम्हाला विकेटकिपर फलंदाज हवा आहे. पंतची जागा कोण घेऊ शकतो यावर आम्ही सध्या शोध घेत असल्याचं रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) म्हटलं आहे.
दरम्यान, ऋषभ पंतला सुरुवातीला सक्षम हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी आणि ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आलं होतं, त्यानंतर अनेक जखमांवर उपचारांसाठी डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता ऋषभ मैदानात उतरणार तरी कधी?, असा सवाल विचारण्यात येत आहे. त्यामुळे आता दिल्ली कॅपिटल्स (DC) नाही तर टीम इंडियाला देखील आगामी वर्ल्ड कपमध्ये (ODI World Cup 2023) ऋषभची उणिव भासेल, हे नक्की.