Rishabh Pant Health Update : भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंतवर (Rishabh Pant) मुंबईमधील कोकिलाबेन अंबानी रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं होतं. पंतच्या गुडघ्याला सूज येत होती त्यामुळे एमआरआय करता येत नव्हता आणि त्याची सर्जरी (Rishabh Pant Surgery) पार पडणार असल्याची माहिती समोर आली होती. अशातच सर्जरीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.  ऋषभवर करण्यात येणारी सर्जरी झाली असून ती यशस्वीपणे पार पाडली गेली आहे. आता ऋषभ वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असून तो लवकर कव्हर होत असल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. (rishabh pant undergoes successful knee surgery mumbai latest marathi sport news)



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉक्टर दिनशॉ पारदीवाला यांच्या देखरेखेखाली उपचार होणार होते. ऋषभची लिगामेंटची सर्जरी होणार होती, अपघातामध्ये दुखापत झाली होती. डॉ. दिनशॉ पारदीवाला यांनीच भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारा नीरज चोप्राच्या गोल्डन आर्मवरही शस्त्रक्रिया केली होती. 


ऋषभ पंतचा 30 डिसेंबरला मोठा अपघात झाला होता. अपघात इतका भीषण होता की ऋषभ पंतची कार जाग्यावर जळून खाक झाली. पंतवर देहरादूनमधील मॅक्स रूग्णालयात उपचार चालू होते. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी पंतला मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं होतं. त्याची गुडघ्यावरील शस्त्रक्रिया पार पडली असून ऋषभ आता लवकर रिकव्हर होत असल्याचं माहिती समोर आल्याने चाहत्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.