मुंबई : शनिवारी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसाने आले होते. या सामन्यात राजस्थानने मुंबईचा पराभव करत दुसरा विजय नोंदवला. या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करत 193 रन्सचं आव्हान मुंबईला दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला केवळ 170 रन्स केले. मात्र यामध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला मोठी खेळी करता आली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने कालच्या सामन्यात केवळ 10 रन्स केले. 5 बॉल्समध्ये 10 रन्स केल्यानंतर प्रसिद्ध कृष्णाच्या बॉलवर रोहित शर्मा कॅच आऊट झाला. ज्यावेळी रोहित शर्माची विकेट गेली त्यावेळी त्याची पत्नी रितीका सजदेजची रिएक्शन पाहण्यासारखी होती.


कालचा सामना पाहण्यासाठी रितीका मुलगी समायरासोबत सामना पाहण्यासाठी आली होती. ज्यावेळी रोहितची विकेट गेली त्यावेळी रितीका पूर्णपणे निराश झालेली दिसली. रोहित आऊट झाल्याने रितीकालाही मोठा धक्का बसला. आयपीएलच्या सुरुवातीपासूनच रितीका रोहिसोबत मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये आहे.



राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर 23 धावांनी विजय मिळवला आहे. राजस्थान या मोसमातील हा दुसरा विजय ठरला आहे. राजस्थानने मुंबईला विजयासाठी 194 धावांचं आव्हान दिले होते. मात्र मुंबईला दिल्लीच्या भेदक माऱ्यासमोर 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 170 धावाच करता आल्या.