नवी दिल्ली : रितू फोगट हरियाणाच्या तीन फोगट बहींणींपैकी एक असून तिने जागतिक स्तरावर कुस्तीमध्ये स्वत:चं कतृत्व सिद्ध केलंय. 


पोलंडमध्ये जिंकलं रौप्य पदक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रितू फोगटने ४८ किलो वजनी गटात पोलंड इथं झालेल्या यु - २३ सिनिअर वर्ल्ड चॅंम्पियनशीपमध्ये रौप्य पदक जिंकलं. अंतिम सामन्यात तुर्कस्तानच्या एवीन डेमिर्हान बरोबर झालेल्या लढतीत तिला हार पत्करावी लागली. 


सिनिअर मल्लांचा केला सामना


अंतिम फेरीत धडक मारतांना तिने अनेक नामांकित खेळाडूंना चीत केलं. या स्पर्धेच्या निमित्ताने रितू फोगटने पहिल्यांदाच जागतिक स्तरावरच्या सिनिअर मल्लांचा सामना केला.


कुस्तीतली भरारी


गेल्या काही वर्षात रितूच्या कामगिरीचा आलेख चढता आहे. याआधी तिने इंदूरला झालेली नॅशनल चॅंम्पियनशीप, सिंगापूरला झालेली कॉमनवेल्थ रेस्लिंग चॅंम्पियनशीप जिंकली आहे. एशियन चॅंम्पियनशीपमध्येही तिने ब्रॉंझ मेडलची कमाई केली होती.