Roger Federer Rafael Nadal: स्टार टेनिस खेळाडू रॉजर फेडररने काही दिवसांपूर्वी  निवृत्ती घोषित घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. 23 सप्टेंबरला 2022 शुक्रवारी () उशिरा झाली फेडरर त्याचा टेनिस (Tennis) कारकीर्दीमधील शेवटची मॅच(last match)खेळला. फेडररचा अखेरच्या लेवर कपमध्ये (Laver Cup) त्याचा पराभव झाला. तब्बल 24 वर्ष टेनिस खेळावर राज्य गाजवणारा 41 वर्षीय रॉजर फेडरर मैदान सोडताना भावूक झाला होता. त्याला अश्रू अनावर झाले. टेनिस मैदानावर उभा राहून त्यानं दोन्ही हात उंचावत उपस्थित चाहत्यांना अभिवादन केले. लेवर कपमध्ये दुहेरी सामन्यात राफेल नदालनं फेडरला साथ दिली.
 


रॉजर फेडरर शेवटच्या सामन्यानंतर घळाघळा रडला...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवृत्तीचं भाषण करताना आणि मैदानातील शेवटची मॅच खेळल्यानंतर रॉजर फेडरर घळाघळा रडला. एवढंच नाही तर फेडररला भावूक पाहून स्टार खेळाडू नोवाक जोकोविचदेखील (novak djokovic) आपले अश्रू रोखू शकला नाही. फेडररच्या शेवटच्या मॅचनंतर अलविदा करताना खेळाडू आणि प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी होते. (roger federer career last match emotional farewell and rafael nadal novak djokovic cried NM)


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये स्टार खेळाडू नडालदेखील (rafael nadal) भावूक झालेला दिसला. 



रॉजहंसाचे राजाश्रू!


निवृत्तीचं भाषण करताना फेडरर ढसाढसा रडला...तो म्हणाला की, "आपण यातून पुढे जाऊ, कसंतरी. आजचा दिवस खरंच अद्भुत होता. मी सगळ्यांना सांगत होतो, मी आनंदी आहे, मी दु:खी नाहीय. इथं तुमच्यासमोर खूप बरं वाटतंय. शूज घालताना आनंदी होतो, पण हे सर्वकाही आता शेवटचं होतं. तरी फारसा त्रास झाला नाही, कारण तुम्ही सगळे इथे आलात - चाहते, कुटुंबीय, मित्र - असे सगळे. आणि सगळ्यांचे, सर्वा लोकांचे आभार. हे सर्व अविश्वसनीय आहे. अत्यंत विलक्षण रात्र आहे."


पाहा फेडररचं शेवटचं भाषण...(Federer's last speech)



टेनिस म्हटलं की, रॉजर फेडरर- राफेल नदाल-नोव्हाक जोकोव्हिच या त्रिकुटाने ग्रँड स्लॅम जेतेपदांवर वर्चस्व गाजवलं आहे. आतापर्यंत फेडररने तब्बल 20 ग्रॅँड स्लॅम (Grand Slam) जेतेपदं मिळवले आहेत. सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदं पटकावणाऱ्यांच्या यादीत फेडरर हा  तिसऱ्या स्थानी आहे.



फेडररच्या नावावर ऑस्ट्रेलियन ओपनची 6 (Australian Open), फ्रेंच ओपनचं 1 (French Open), विम्बल्डन (Wimbledon) स्पर्धेची 8 तर युएस ओपन (US Open) स्पर्धेची 5 अशी एकूण 20 जेतेपदं नावावर आहेत.