विम्बल्डन : स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने विम्बल्डनमध्ये ऐतिहासिक यश मिळवलेय. विम्बल्डनच्या आठव्या जेतेपदाला फेडररने गवसणी घातलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वय वाढले असले तरी जिंकण्याची प्रबळ इच्छाशक्ती त्यासोबतच खेळातील सातत्या याच्या जोरावरच फेडररला हे यश मिळवता आलेय. 


अंतिम फेरीत फेडररने मरिन चिलीचवर ६-३.६-१.६-४ असा विजय मिळवत १९वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवलेय. सुरुवातीपासूनच फेडररच जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात होता. संपूर्ण सामन्यात फेडररने चिलीचला वरचढ होण्याची एकही संधी दिली नाही.