विजयाची भूक अद्यापही कायम: फेडरर
वयाच्या मर्यादेला कामगिरीच्या जोरावर मैदानाबाहेर पिटाळून लावणाऱ्या रॉजर फेडररने आपली `मन की बात` केली आहे. फेडरर म्हणतो की, मलाच माहिती नाही की, मी आणखी किती काळ टेनिस खेळेन. कारण, माझ्यात विजयाची भूक अद्यापही कायम आहे.
मेलबर्न: वयाच्या मर्यादेला कामगिरीच्या जोरावर मैदानाबाहेर पिटाळून लावणाऱ्या रॉजर फेडररने आपली 'मन की बात' केली आहे. फेडरर म्हणतो की, मलाच माहिती नाही की, मी आणखी किती काळ टेनिस खेळेन. कारण, माझ्यात विजयाची भूक अद्यापही कायम आहे.
फेडररने कारकीर्दीतला २०वा ग्रॅंडस्लॅम चषक जिंकला
फेडरर हा स्वित्झरलॅंडचा ३६ वर्षीय खेळाडू. नुकताच त्याने सहावा ऑस्ट्रेलियाई ओपन आणि त्याच्या एकूण कारकीर्दीतला २०वा ग्रॅंडस्लॅम चषक जिंकला. मारिन सिलिचला अंतिम सामन्यात जोरदार टक्कर देत त्याने हा किताब जिंकला. गेल्याच वर्षी त्याने राफेल नदालला पराभूत करत हा सामनाही जिंकला होता.
वयाचा आणि कामगिरीचा काहीही संबंध नाही
तू आणखी किती काळ टेनिस खेळणार या प्रश्नावर रॉजर मनूर्वक हसून दाद देतो. तो म्हणतो, अगदी इमानदारीने सांगतो. खरेच मला माहिती नाही की, मी आणखी किती काळ टेनिस खेळेन. माझ्यात विजयाची भूक अद्यापही कायम आहे. अगदी ताजे उदाहरण द्यायचे तर, गेल्या १२ महिन्यात मी एकूण ३ ग्रॅडस्लॅम जिंकले. हे यश पाहून मला माझ्यावरही विश्वास बसत नाही. खरे तर, वयाचा आणि कामगिरीचा काहीही संबंध नाही. तो केवळ एक आकडा असतो. खेळ ही माझी प्राथमिकता आहे. ती मी पूर्ण करतो.
टूर्नामेंटमधून मिळते उर्जा
पुढे बोलतान रॉजर म्हणतो, अगदी प्रत्येकच टूर्नामेंट मी नाही खेळू शकत. मात्र, मला अभ्यास करायला प्रचंड मजा येते. माझ्याजवळ चांगली टीम आहे. त्यामुळेच मी जिंकू शकलो. मला टूर्नामेंट पहायला आवडते. त्यातून मला प्रचंड उर्जा मिळते, असेही फेडरर म्हणतो.