एडिलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यामध्ये ओपनर रोहित शर्माने 52 बॉलमध्ये 43 रन केले. या इनिंगमध्ये त्याने 2 फोर आणि २ सिक्स लगावले. यासोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरोधात सर्वाधिक शतक ठोकण्याचा रेकॉर्ड त्याने आपल्या नावे केला. सोबतच त्याने एका टीमच्या विरुद्ध सर्वाधिक शतक ठोकण्याचा रेकॉर्ड देखील बनवला. याआधी हा रेकॉर्ड वेस्टइंडिजचा क्रिकेटर क्रिस गेलच्या नावावर होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिडनीमध्ये झालेल्या या सिरीजच्या पहिल्या सामन्यामध्ये रोहितने 133 रनची शानदार खेळी केली होती. यादरम्यान त्याने 6 सिक्स लगावले होते. ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने आतापर्यंत 87 सिक्स लगावले आहेत. इंग्लंड विरुद्ध कोणत्याही एका टीम विरुद्ध सर्वाधिक शतक ठोकण्याच्या बाबतीत गेल पहिल्या स्थानावर होता. एडिलेड वनडेमध्ये रोहितने हा रेकॉर्ड देखील आपल्या नावे केला आहे.


रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 340 सिक्स लगावले आहेत. त्याच्या नावावर वनडेमध्ये 210, टी-20मध्ये 98 तर टेस्टमध्ये 32 सिक्स आहेत. ज्यापैकी 89 सिक्स फक्त ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध आहे.


याआधी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने भारताला 299 धावांचं तगडं आव्हान दिले. ऑस्ट्रेलियाने 9 विकेट गमावत 298 धावा केल्या. शॉन मार्शच्या 131 धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला 298 धावांचा आकडा गाठता आला. शॉन मार्शला ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चांगली साथ देता आली नाही. केवळ ग्लेन मॅक्सवेलने 48 धावा केल्या. तर गोलंदाजी करतान सर्वात जास्त विकेट भुवनेश्वर कुमारने 4 विकेट घेतले. तर मोह्म्मद शमीने 3 विकेट घेतले.