Rohit Sharma: गेल्या वर्षी भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला ( Team India ) फायनल सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत पुन्हा एकदा वर्ल्डकपवर नाव कोरलं. या पराभवाचा खेळाडूंसोबत संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान टीम इंडियाने माजी सिलेक्टर चेतन शर्मा ( Chetan Sharma ) यांनी रोहित शर्माचे ( Rohit Sharma ) कौतुक केलंय. 


रोहित शर्माबाबत काय म्हणाले चेतन शर्मा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचा ( Team India ) कर्णधार रोहित शर्मावर ( Rohit Sharma ) अनेक टी का करण्यात आल्या. मात्र बीसीसीआयचे माजी सिलेक्टर चेतन शर्मा ( Chetan Sharma ) यांनी त्याचं कौतुक केलं आहे. रोहितचे ( Rohit Sharma ) कौतुक करताना चेतन म्हणाले, हिटमॅन ( Rohit Sharma ) अशा काही खेळाडूंपैकी एक आहे ज्यांनी टीमसाठी बलिदान दिलंय. त्याने आघाडीचे नेतृत्व केलं. रोहितने ( Rohit Sharma ) 2022 च्या T20 वर्ल्डकपमध्येही गोलंदाजांची धुलाई केली होती. परंतु पीच आणि इतर काही कारणांमुळे त्याची योजना यशस्वी झाली नाही. वनडे वर्ल्डकपमध्ये त्याने चांगला खेळ केला. 


वर्ल्डकपनंतर फार निराश झाला होता रोहित


रोहितने ( Rohit Sharma ) या स्पर्धेत एका शतकाच्या जोरावर 500 हून अधिक रन्स केले. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा ( Team India ) फायनल सामन्यात पराभव केला. मोठ्या स्पर्धेत झालेल्या या एकमेव पराभवानंतर तो दु:खी झाला होता आणि त्यातून सावरण्यासाठी आणि क्रिकेटमध्ये परतण्यासाठी त्याला बराच वेळ लागला. सध्या तो इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करतोय. 


विराटसंदर्भात काय म्हणाले माजी सिलेक्टर?


2023 चा वनडे वर्ल्डकप रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि विराट कोहलीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. यावेळी चेतन शर्मा ( Chetan Sharma ) यांनीही विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य केलं. ते म्हणाले, विराट कोहली मला माझ्या मुलासारखा आहे आणि मी त्याच्याविरुद्ध वाईट का बोलणार? त्याच्या आरोग्यासाठी मी नेहमी प्रार्थना करतो. मला आशा आहे की तो कमबॅक करेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकं पूर्ण करण्याचा विक्रम तो नक्की करेल. विराट हा भारतीय क्रिकेटचा आयकॉन आहे.