`तुझ्या डोक्यात काही...` भर मैदानात वेगवान गोलंदाजावर चिडला रोहित शर्मा, Video होतोय व्हायरल
IND VS AUS 3rd Test : टीम इंडिया मात्र 17 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून फक्त 51 धावांच करू शकली. दरम्यान पहिल्या सत्रात भारताची गोलंदाजी सुरु असताना रोहित शर्मा भारताच्या वेगवान गोलंदाजांवर भडकला.
IND VS AUS 3rd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून सध्या या सीरिजचा तिसरा सामना हा ब्रिस्बेन (गाबा) येथे खेळवला जात आहे. शनिवार 14 डिसेंबर पासून सुरु झालेल्या या सामन्यावर पावसाचे सावट आहे. सोमवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाची फलंदाजी गडगडली. समोर ऑस्ट्रेलियाने उभारलेला 445 धावांचा डोंगर असताना टीम इंडिया मात्र 17 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून फक्त 51 धावांच करू शकली. दरम्यान पहिल्या सत्रात भारताची गोलंदाजी सुरु असताना रोहित शर्मा भारताच्या वेगवान गोलंदाजांवर भडकला.
नेमकं काय घडलं?
एडिलेट टेस्ट सामन्यात हर्षित राणा फ्लॉप ठरल्यावर कर्णधार रोहित शर्माने आकाश दीपला संधी दिली. गाबा टेस्टमध्ये आकाश दीप भारतासाठी अनेक विकेट्स काढले अशी अपेक्षा होती. मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांसमोर त्याची गोलंदाजी चालली नाही. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशीच 400 पार स्कोअर केला होता, त्यामुळे टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाच्या संघाला लवकरात लवकर ऑल आउट करण्याचे प्रेशर होते. दरम्यान 114 वी ओव्हर आकाश दीपने टाकली दरम्यान त्याने एक बॉल वाइड बॉल टाकला. पण ऋषभ पंतची उत्कृष्ट फलंदाजीमुळे बॉल बाउंड्री बाहेर जाता जाता राहिला. दरम्यान रोहित शर्मा खूप नाराज दिसला. त्याने आकाश दीपला फटकारलं. रोहित आकाशची गोलंदाजी पाहून म्हणाला, 'डोक्यात काही आहे का..'. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
हेही वाचा : बुमराहला 'माकड' म्हणणाऱ्या महिला कॉमेंटेटरचं डोकं ठिकाण्यावर आलं; मागितली माफी, नेमकं काय घडलं?
भारताची टॉप ऑर्डर गडगडली :
टीम इंडियाची ओपनिंग जोडी यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल मैदानात आले. यशस्वीला पुन्हा एकदा पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर बाद झाला. तो केवळ एक चौकार ठोकून आल्या पावलीच माघारी परतला. तर त्यापाठोपाठ तिसऱ्या ओव्हरला शुभमन गिल देखील फक्त १ धाव करून माघारी परतला. तर त्यानंतर विराट कोहली (3) आणि ऋषभ पंतने (9) देखील स्वस्तात विकेट गमावली. त्यानंतर केएल राहुलची (नाबाद 33) साथ देण्यासाठी रोहित शर्मा मैदानात आला. परंतु पावसाचे आगमन झाल्यामुळे सामना थांबवण्यात आला. काही वेळाने पाऊस थांबला देखील परंतु सामना सुरु करण्यासाठी योग्य परिस्थिती नसल्याने तिसऱ्या दिवसाचा खेळ अधिकृतपणे थांबवण्याचा निर्णय अंपायरकडून घेण्यात आला. दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया 394 धावांनी आघाडीवर आहे.
पाहा व्हिडीओ :
भारताची प्लेईंग 11 :
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), रोहित शर्मा (कर्णधार), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
ऑस्ट्रेलियाची प्लेईंग 11 :
उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.