शमी-भुवीच्या निष्काळजीपणावर भडकला Rohit Sharma; व्हिडीओ व्हायरल
या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतोय.
T20 World cup : T20 वर्ल्डकपच्या 2022 (T20 World cup) च्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने टीम इंडियाचा (Team India) पराभव केला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या (England) टीमसमोर 169 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या टीमची सुरुवात चांगली झालीये. त्यांनी हे लक्ष्य गाठून फायनलचं तिकीट पक्क केलंय. यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांवर जोरदार टीका होतेय. दरम्यान या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतोय.
इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जॉस बटलरने 9व्या ओव्हरमध्ये दुसऱ्या बॉलवर विकेटच्या मागून एक शॉट मारला. या बॉलचा पाठलाग करताना बॉल हातात आल्यावर शमी त्याच्या मागे धावला. यादरम्यान बॉल विकेटकीपरच्या हातात न देता भुवनेश्वर कुमारच्या हातात देतो. यावेळी बॉल भुवीपासून दूर जातो. या प्रकारावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा वैतागलेला दिसतो.
यावेळी भर सामन्यात रोहित शर्मा टीमचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर आरडाओरड केली. यावेळी पराभवाचा राग त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. रोहित शर्मा भर मैदानात संपातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
टीम इंडियाचा 10 विकेट्सने पराभव
कालच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने तुफान फलंदाजी करत भारताला धूळ चारली. 24 बॉल्स आणि 10 विकेट्स राखून इंग्लंडने भारताचा धुव्वा उडवला आहे. या सामन्यात अॅलेक्स हेल्स आणि जोस बटलर यांनी धडाकेबाज फलंदाजी केली. हेल्सने 47 बॉल्समध्ये 86 तर 49 बॉल्समध्ये 80 रन्सची नाबाद खेळी करत वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक मारलीये. यावेळी टीम इंडियाचे गोलंदाज पुन्हा एकदा फेल गेले. भारताच्या गोलंदाजांना एकंही विकेट काढता आली नाही.
दुसऱ्या सेमी फायनलचा टॉस इंग्लंडचा (England) कर्णधार जोस (Jos Buttler) जिंकला आहे. इंग्लंडने प्रथम फिल्डींग करत टीम इंडियाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. इंग्लंडने प्रथम फिल्डींग करत टीम इंडियाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 168 रन्स केले. इंग्लंडला जिंकण्यासाठी 169 रन्सची आवश्यकता होती.