Rohit Sharma: सध्या भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात वनडे सिरीज सुरु असून शुक्रवारी पहिला सामना खेळवण्यात आला. यावेळी पहिल्या सामन्यात टीम इंडिया जिंकण्याच्या स्थितीत होती. मात्र पहिला वनडे सामना अनिर्णित राहिला. भारत विरुद्ध श्रीलंका पहिली वनडे टाय झाल्यानंतर भारतीय खेळाडू अर्शदीप सिंग चाहत्यांच्या निशाण्यावर आहे. 47व्या ओव्हरमध्ये टीम इंडियाला विजयासाठी 1 रनची गरज होती. मात्र एक विकेट शिल्लक असताना अर्शदीपने खराब शॉट खेळून स्वतःची विकेट गमावली आणि सामना टाय झाला.


रोहित शर्माच्या मेहनतीवर फेरलं पाणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात ओपनिंग करताना चांगली फलंदाजी केली होती. 58 रन्सची खेळी करत रोहितने टीम इंडियला एक चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करत टीमला विजय मिळवून देता आला नाही. यावेळी शेवटचा एक रन हवा असताना सामना टाय झाला. अशावेळी रोहितला राग येणं स्वाभाविक होतं. जर अर्शदीप मोठ्या शॉर्टच्या नादात खेळला नसता तर भारताने सामना जिंकला असता. 


रोहितने अर्शदीपकडे रागाने पाहिलं?


दरम्यान या अर्शदीप सिंगवर सोशल मीडियावर बरीच टीका झाली. यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेणारा एक फोटोही समोर आला. या फोटोमध्ये रोहित शर्मा मॅचनंतर हँडशेक करताना रागाने अर्शदीप सिंगकडे बघताना दिसतोय. तर अर्शदीप सिंगचे देखील त्याच्याकडे पाहताना दिसतोय. अनेक चाहत्यांनी असंही सांगितलं की, अर्शदीप सिंग धोनीसारखा विजयी सिक्स मारून हिरो बनण्यासाठी निघाला होता, पण हिरोऐवजी तो  झिरो झाला.



पहिला वनडे सामना झाला टाय


पहिल्या वनडे सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर श्रीलंकेच्या टीमने 50 ओव्हर्समध्ये 8 विकेट्स गमावून 230 रन्स केले. स्पिनरला अनुकूल पिचवर टिकून राहणं फलंदाजांसाठी सोपं नव्हतं. श्रीलंकेकडून वेल्लालाघेने 65 चेंडूंत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 67 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्याशिवाय ओपनर पथुम निसांकानेही अर्धशतक झळकावलं. भारताकडून अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी सर्वाधिक 2-2 विकेट्स घेतल्या.


या स्कोरचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या 10 ओव्हर्समध्ये रोहित शर्माने 47 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 58 रन्स केले. मात्र, हिटमॅन बाद झाल्यानंतर भारताचा स्कोर स्लो झाला आणि अखेरीस संपूर्ण टीम 47.5 षटकांत 230 रन्सवर गारद झाली.