मुंबई : कालच्या सामन्यात पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा हिरमोड झाला. चेन्नई सुपर किंग्ज विरूद्धच्या सामन्यात 3 विकेट्सने मुंबईचा पराभव झाला. मुंबई इंडियन्सचा यंदाच्या सिझनमधील हा सलग 7 वा पराभव होता. हातातोंडाशी आलेला सामना गमावल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा फार निराश झाला आहे. मात्र या सामन्यात आपण चांगली फाईट दिल्याचं रोहितने सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईविरूद्धच्या पराभवानंतर रोहित शर्मा म्हणाला, "आम्ही आमच्या बाजूने चांगली लढत दिली. चांगली फलंदाजी केली नाही तरीही आम्ही खेळात पाय रोवून होतो. मात्र तुम्हाला माहितीये, धोनी शेवटी येऊन काय करू शकतो. त्यानेच चेन्नईला विजय मिळवून दिला." 


कोणाकडे बोट दाखवणं कठीण आहे. मात्र आम्ही सामन्यात चांगली सुरुवात करू शकलो नाही. जर तुम्ही सुरुवातीला अनेक विकेट गमावत असाल तर तुम्ही खेळामध्ये पिछाडीवर जाता, असंही रोहित म्हणाला.


रोहित पुढे म्हणाला, आम्ही शेवटपर्यंत समोरच्या टीमवर दबाव आणला होता. पण धोनीने आमचा विजय हिरावला. आम्ही नेहमीच चांगली कामगिरी करण्यासाठी स्वतःला पाठिंबा देतो परंतु मी म्हटल्याप्रमाणे, आम्ही सुरुवातीच्या काळात खूप विकेट गमावल्या. गोलंदाजीमध्ये आम्ही कमबॅक केलं परंतु ते पुरेसं नव्हतं. 


मुंबई इंडिन्सने चेन्नई सुपर किंग्सला 156 रन्सचं आव्हान दिलं होतं. चेन्नईकडून अंबाती रायडुने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. तर रॉबिन उथप्पाने 30 रन्सचं योगदान दिलं. धोनीने निर्णायक क्षणी 28 धावांची नाबाद विजयी खेळी साकारली. तर प्रिटोरियसने नाबाद 22 धावा करत धोनीला चांगली साथ दिली. यामुळे चेन्नईचा विजय निश्चित झाला.