रोहित शर्माने सचिन आणि सेहवागला टाकलं मागे
भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने शानदार डबल सेंच्युरी ठोकली आहे.
मोहाली : भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने शानदार डबल सेंच्युरी ठोकली आहे.
रोहितचा विक्रम
रोहितने शानदार बॅटींग करत नाबाद २०८ रन केले. ही त्याच्या करिअरमधली तिसरी डबल सेंच्युरी आहे. वनडे क्रिकेटमध्ये तीन वेळा डबल सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर झाला आहे. रोहितने या डबल सेंच्युरीने सचिन तेंडुलकरचा देखील रेकॉर्ड मोडला आहे.
सचिनला टाकलं मागे
मोहालीमधली रोहितची ही वनडे करिअरमधली १६ वी सेंच्युरी आहे. सचिनने १६ व्या सेंच्युरीसाठी १८५ इनिंग खेळल्या होत्या. पण रोहितने १८ इनिंग आधीच हा कारनामा केला आहे.
सेहवागला टाकलं मागे
भारतासाठी सर्वाधिक वनडे शतकच्या बाबतीत रोहितने सेहवागचा देखील मागे सोडलं आहे. वीरेंद्र सेहवागने १५ शतक ठोकले आहेत. रोहित आता भारताकडून सर्वाधिक वनडे शतकांच्या बाबतीत चौथ्या स्थानावर आला आहे. त्याच्या पुढे सचिन (49), विराट कोहली (32) आणि सौरव गांगुली (22) शतकांसह त्याच्या पुढे आहेत.