Rohit Sharma Steve Smith: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Border–Gavaskar Trophy) पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळवला जातोय. या सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) कॅप्टन इनिंग खेळत शतक ठोकलं. कांगारूंविरूद्ध हिटमॅनची (Hitman) बॅट चांगलीच तळपली. मात्र सोशल मीडियावर रोहित शर्मा अजून एका कारणामुळे चर्चेचा विषय बनलाय. हे कारण म्हणजे, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथला (Steve Smith) भर मैदानात रोहितने 'पागल' म्हटलं आहे. रोहित शर्माचा हा आवाज स्टंप माईकमध्ये कैद झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्णधार रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा एकत्र फलंदाजी करत असतानाचा हा व्हिडीओ आहे. यावेळी रोहितने त्याचं शतक पूर्ण केलं होतं आणि तो मोठा स्कोर करण्याच्या मनस्थितीत होता. याचवेळी 6 व्या ओव्हरमध्ये एक बॉल स्टिव्ह स्मिथकडे गेला आणि रोहितने त्याठिकाणी एक रन काढून घेतला. मुख्य म्हणजे, यावेळी रविंद्र जडेजा दुसरा रन घेऊ इच्छित होता, त्यामुळे त्याने रोहितला रनसाठी कॉलही दिला. 


जडेजाचा कॉल ऐकून रोहितने रिएक्ट केलं आणि रन घेण्यास नकार दिला. यावेळी त्याचा आवाज स्टंप माईकमध्ये कैद झाला आहे. रोहितने यावेळी जडेजाला सांगितलं की, हा पागल आहे, राहूदेत!' मुळात रोहितचे हे शब्द स्टिव्ह स्मिथसाठी होते. रोहित शर्माला याची कल्पना होती, स्मिथला जडेजा किंवा त्याला रनआऊट करण्याची संधी मिळाली तर ती संधी तो अजिबात सोडणार नाही. 



स्मिथ एक चांगला फिल्डर आहे, आणि रोहित शर्माला हे चांगलंच परिचित आहे. त्यामुळे रोहितने जडेजाला दुसरा रन घेण्यास मनाई केली.


कांगारूंविरूद्ध एकटा लढला Rohit Sharma


गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आऊट ऑफ फॉर्म होता. नुकतंच वनडेमध्ये शतक ठोकल्यानंतर आता टेस्ट क्रिकेटमध्ये देखील त्याने शतक करत टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नागपूरच्या टेस्टमध्ये चाहत्यांना पुन्हा एकदा जुना रोहित शर्मा पहायला मिळाला. 


नागपूरचं पीच असं आहे जिथे, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि सूर्यकुमार यादव सारखे फलंदाज स्वस्ताक माघारी परतले. मात्र टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा एकटाच खेळला आणि खणखणीत शतक मारलं. रोहितने 120 रन्सची उत्तम खेळी केली आहे.


या कारणाने सेंच्युरीनंतरही रोहितने काढलं नाही हेल्मेट


सामान्यपणे कोणताही फलंदाज शतक पूर्ण झाल्यानंतर त्याचं हेल्मेट काढतो. मात्र रोहित शर्माने आज शतक ठोकल्यानंतर असं केलं नाही. याचं कारण म्हणजे, त्यावेळी नागपूर टेस्टमध्ये कठीण परिस्थितीत होती. त्यामुशे ज्यावेळी रोहितचं शतक पूर्ण केलं तेव्हा त्याने हेल्मेट न काढता सेलिब्रेशन केलं.