Team Indias New Head coach : टीम इंडियाच्या पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी आज बीसीसीआयने मुलाखती घेतल्याची माहिती समोर आलीये. टीम इंडियाचा आगामी हेड कोच कोण असेल? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीर याचं नाव निश्चित मानलं जातंय. तर वी व्ही रमन यांनी देखील अर्ज केला होता, अशी माहिती समोर आलीये. क्रिकेट सल्लागार समितीने घेतलेल्या मुलाखतीत आता कोणाला टीम इंडियाची जबाबदारी मिळणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. परंतू आता गौतम गंभीरने मुलाखतीत बीसीसीआयसमोर काही अटी ठेवल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर आलीये.


गौतम गंभीरच्या अटी काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौतम गंभीरने बीसीसीआयसमोर दोन शर्ती ठेवल्याची माहिती समोर आलीये. गंभीरची पहिली अट म्हणजे त्याला संघाचा पूर्ण कंट्रोल पाहिजे. तर दुसरी अट म्हणजे टेस्ट क्रिकेट, टी-ट्वेंटी क्रिकेट आणि एकदिवसीय क्रिकेट यासाठी गौतम गंभीरला वेगवेगळे संघ निवडण्याची मुभा हवी आहे. गौतम गंभीरच्या अटीमुळे आता रोहित शर्मा, जो सध्या तिन्ही फॉरमॅटचा कॅप्टन आहे, त्याची कॅप्टन्सी धोक्यात आली आहे. रोहित शर्माला टेस्टचा कॅप्टन कायम ठेवला जाणार का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. 


विराट कोहलीचं काय होणार?


विराट कोहली टीम इंडियाचा सुपरस्टार आहे. विराट तिन्ही फॉरमॅटमध्ये आपली ताकद दाखवू शकतो. मात्र, जर तीन वेगवेगळ्या टीम तयार करण्याची वेळ आली तर विराट कोहली तिन्ही फॉरमॅट खेळणार की नाही? असा सवाल देखील विचारला जाऊ लागला आहे. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौतम गंभीर हेड कोच बनताच भारतीय संघातून चार खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. हे चार खेळाडू कोण असतील? याचा खुलासा अद्याप झालेला नाही. त्यामुळे आता रोहित शर्मा याच्यासह अनेक खेळाडूंचं टेन्शन वाढलं आहे.


दरम्यान, गौतम गंभीरची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुलाखत झाली. पण गंभीरबरोबरच बीसीसीआच्या क्रिकेट अॅडव्हायजरी कमिटीने मंगळवारी माजी भारतीय क्रिकेटर वुरकेरी वेंकट रमन (Woorkeri Raman) यांचीही मुलाखत घेतली अशी माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रमन यांनी चांगलं प्रेजेंटेशन सादर केलंय.